आरोग्य व सौंदर्य

जी बी एस आजाराची मनपा आयुक्त यांनी घेतली जेंबो बैठक

Spread the love

अमरावती – महानगर पालिकेच्या वतीने शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सूचनांच्या अनुषंगाने गुलेन बॅरी आजाराबाबत सचिन कलेंत्रे मनपा आयुक्त यांच्या अध्यक्ष खाली महानगर पालिकेत जेम्बो बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीत सचिन कलंत्रे यांनी पशू विभाग ,आरोग्य विभाग, जिल्हा प्रयोग शाळा , महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विभाग व खाजगी रुग्णालय यांना निर्देश दिले की कोणताही रुग्ण हा जी बी एस आजाराच्या लक्षण दिसत असेल तर तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधावा तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सुद्धा आपल्या आरोग्य केंद्रात अतिसार ,हाता पायात मुंग्या येणे बधीर होणे असे लक्षण आढळल्यास आपल्या नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असे सांगितले तसेच डॉ विशाल काळे यांनी यांनी सुध्दा जी बी एस आजार संदर्भात शहरात कुठेही लक्षण दिसून आल्यास साथ रोग कक्ष्याची संपर्क करावा असे कळविले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .दिलीप सोंदले यांनी सांगितले की जिल्यात निदान झालेले अजून रुग्ण नसून उपाय योजना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुख सोयींनी उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती दिली डॉ .किशोर इंगोले अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी सुध्दा घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले डॉ रुपेश खडसे यांनी ह्या जेंबो बैठकीचे आयोजन करून जनजागृती व्हावी व जनतेमध्ये निराशेचे वातावरण होऊ नये व सर्व विभाग जिबीएस आजारासाठी लडण्यास तयार आहे ह्या उद्देशाने आढावा चर्चा घेण्यात आली ह्या महत्वाच्या बैठकीत डॉ संदीप पाटबागे डॉक्टर इन्चार्ज यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णाची काटेकोर तपासणी करावी असे निर्देश दिलेत डॉ सचिन बोंद्रे यांनी पशू व पोल्ट्री फॉर्म मधून हा आजार होत नसून अश्या सूपष्ट मार्गदर्शन सूचना पशू विभागाकडून आल्या नसल्याचे सांगितले ह्या महत्वाच्या जेम्बो बठकीत शहराची रॅपिड टीम तयार करण्यात आली ह्या मध्ये बालरोग तज्ञ , न्यूरोलोगिष्ट ,फिजीशियन , माणसं तज्ञ ,वैद्यकीय महाविद्यालय चे वैद्यकिय अधिकारी , प्रयोग शाळा तज्ञ साथ रोग नियंत्रण अधिकारी ,अन्न व औषध यांचे अधिकारी अशी टीम बनवण्यात आली ह्या बैठकीत डॉ स्वाती कोवे, डॉ पौर्णिमा उघडे, डॉ निगार खान , डॉ मानसी मुरके, डॉ आकिब खान , डॉ अजय जाधव,देवेंद्र बायकर , डॉ वैशाली कावरे , डॉ जौशफा अलमास खान , डॉ.मनोज मुंडळा व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच महात्मा फुले जन आरोग्य चे अंकिता मतले यांनी जी बी एस चे उपचार साठी पॅकेज असल्याचे सांगितले व सर्व शहरातील यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले असे सर्व तज्ञ व रॅपिड टीम चे माध्यमातून येकल्याने मनपा आयुक्त सचीन कलंत्रे यांनी आनंद व्यक्त केला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close