अमरनाथ याञेकरुचा कमल सखी मंच व विजय संकंल्प कडून 35 याञेकरु व जत्थेदाराचा सत्कार संपन्न….
नव प्रहार ( प्रतिनिधी ) अनिल डाहेलकर
मूर्तिजापूर
सामुहिक प्रार्थना, सामुहिक कार्य केल्याने काम यशस्वी होते. अमरनाथ यात्रा ही कठीण यात्रा सातत्याने २९ वर्षांपासून वेगेवेगळ्या वर्गातील नागरिकांना एकत्रित अमरनाथ यात्रा घडवणारे व पहिला जत्था नेणारे प्रदीप खडके सारखे कार्यकर्त्यामुळे सनातन धर्माची पताका अविरतपणे सातत्याने ऊंचावत असून श्री खडखे सारखे सनातन धर्माचा गवगवा करित खारीचा वाटा उचलून कार्य करीत असल्यामुळे समाजाला दिशादर्शक कार्य होत असल्याचे प्रतिपादन कमल सखी मनच्या नेत्या सौ.सुहासिनिताई धोत्रे यांनी केले.
स्थानिक ग्रामदैवत राज्र राजेश्वर मंदिर येथे ३५ जणांचा अमरनाथ यात्रेला जाणार्यांचा सत्कार व सन्मान भाजपा व विजय संकल्पाच्या वतीने आयोजित त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री विजय अग्रवाल होते तर मंचावर सौ. मंजुशाताई सावरकर, सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा वैशालीताई शेळके, साधना येवले, माधव मानकर, गिरीश जोशी बंडू नायसे, देवाशिष काकड संजय जसनपुरे, राजेश्वर मंदिराचे व्यवस्थापक अशोक जोशी, राजेश्वर आरती मंडळाचे संजय शर्मा, अतुल अग्रवाल, सत्यनारायण झंवर, कोठारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी विजय संकल्प च्या वतीने प्राथमिक औषधी कीट व विविध वस्त्तु विजय अग्रवाल यांचे वतीने देण्यात आल्या. तर विजय अग्रवाल यांनी अमरनाथ यात्रेचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गिरीश जोशी व आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले या वेळी अभिषेक व महाजप करून भरपूर पाउस येवो व शेतकरी व नागरिक सुखी संपन्न व्हावे अशी प्रार्थना करण्या आली.