क्राइम

गणपती मंडपाजवळ खेळायला गेलेल्या मुलावर अतिप्रसंग 

Spread the love

चित्रीकरण करून वाच्यता न करण्यासाठी धमकावले

कऱ्हाड / नवप्रहार डेस्क 

                 कऱ्हाड शहरालगत असलेल्या एका गावात गणपती मंडपा जवळ खेळायला गेलेल्या किशोरवयीन मुलावर चार तरुणांनी अतिप्रसंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. चार तरुणा पैकी दोन मुलं अवयस्क आहेत. पीडित मुलगा रात्री झोपेतून उठून घराबाहेर जाऊन बसत असल्याने आणि त्याला वारंवार उलट्या होत असल्याने पालकांनी विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली तेव्हा ही घटना समोर आली. आरोपींनी त्याचे चित्रीकरण करून घटनेची कुठे वाच्यता करू नको असे धमकावले होते. कुटुंबीयांनी घटनेची तक्रार  शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्याप्रकरणी पीडित मुलाच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील दोघांना अटक केली आहे, तर अन्य दोघे अल्पवयीन आहेत. ओम संजय डुबल (वय १९) व प्रसाद महेश कुलकर्णी (१९) अशी पोलिसांनी  अटक केलेल्यांची नावे आहेत.

कऱ्हाड पोलिसांनी दिलेली माहिती माहिती अशी, की कऱ्हाड शहरालगतच्या एका गावात पीडित मुलगा आठ सप्टेंबरला दुपारी चारच्या सुमारास परिसरातील एका गणेश मंडळाजवळ  खेळण्यासाठी गेला होता. त्या वेळी प्रसाद कुलकर्णी, ओम डुबलसह अन्य अल्पवयीन दोघांनी संबंधित पीडित मुलाला नजीकच्या हॉलमध्ये नेले. त्यांनी त्याला मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखविल्या, तसेच त्याचे लैंगिक शोषण केले. त्याचे त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ  चित्रीकरणही केले, तसेच पीडित मुलाला घडलेला प्रकार कोणाला सांगू नकोस, असे धमकावण्यात आले.

या प्रकारानंतर पीडित दोन दिवस भीतीच्या छायेखाली होता. काही दिवस घराबाहेर खेळायला गेला नाही. मध्यरात्री उठून घराबाहेर जाऊन बसत होता. वारंवार उलट्या करीत होता. त्या मुलाने शाळेत जाणे बंद केले. सतत तो तणावाखाली राहायला लागला. कुटुंबीयांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हकिकत सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close