क्राइम

या महिला अधिकाऱ्याकडे सापडली कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता

Spread the love

अलिबाग / नवप्रहार मीडिया

                     येथील महिला तहसीलदार मीनल दळवी यांच्या येथे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे.दोन वर्षांपूर्वी त्या लाचखोरी प्रकरणात सापडल्या होत्या .निलंबित अलिबाग तहसीलदार मीनल दळवी आणि आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी लाचखोरी प्रकरणात निलंबित  आहेत. बेहिशेबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा 84 टक्के अधिक आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबागमध्ये दोन वर्षांपूर्वी मिनल दळवी या तहसिलदार म्हणून कार्यरत  होत्या. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिनल दळवी यांना 2 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 84 टक्के अधिक म्हणजे सव्वादोन कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता सापडली  आहे. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी नवी मुंबई पथकाने मीनल दळवी यांना सापळा रचून लाच घेताना अटक केली होती. तेव्हा महिन्याभर लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते.

११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने तक्रारदाराकडून २ लाख रूपये लाच घेताना राकेश चव्हाण याला अटक केली होती. तेव्हा राकेश चव्हाण याने दळवींसाठी लाच घेत असल्याचं सांगितलं  होतं.

तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते. अलिबाग येथील त्यांच्या घराची तपासणी केली असता ६० तोळे सोने आणि २८ हजार रोकड मिळाली होती. तर मुंबई विक्रोळी याठिकाणीही दळवी यांची मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं तेथील घरातून एक कोटी रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close