क्राइम

कुटुंब न्यायालयाच्या आवाराच्या आत कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

Spread the love
ठाणे /विशेष प्रतिनिधी 
 
          महिलेला स्पा सेंटर मध्ये नोकरी देऊन महिलेचा विश्वास संपादन करणाऱ्या दोन नराधमांनी त्याच महिलेला वाढदिवसाचे कारण सांगून कार मध्ये नेले. तिच्यावर बलात्कार केला . अश्लील व्हिडिओ बनवून तिला वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला  ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यावर अत्याचार केले. शेवटीं या प्रकाराला कंटाळलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने तिने त्या नंबरवर संपर्क साधला. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली. २५ ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींपैकी एकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे असे सांगून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावले.

यानंतर आरोपींनी ही कार थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारातील एका अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यानंतर पीडित महिलेची शुद्ध हरपली. याच संधीचा फायदा घेत गाडीतील दोन्ही आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close