निवड / नियुक्ती / सुयश

खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष पदी गजानन धोटे गुरुजी तर उपाध्यक्ष पदी शरद कडू

Spread the love

 

सचिव म्हणुन भुजंगराव कडू यांची अविरोध निवड.

अंजनगाव सुर्जी, ( मनोहर मुरकुटे )

संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत सहकार क्षेत्रामध्ये गेली एक वर्षांपासून स्थगित असलेल्या निवडणुकीचा ज्वर सुरू असतांना नुकतीच मार्च महिन्यात
अंजनगाव तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली ,होती ह्यामध्ये खरेदी, विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज दि. 3 ला तालुका खरेदी विक्री संघा च्या कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरीता गजाननराव धोटे गुरुजी तर उपाध्यक्षपदी शरद कडू तर सचिव पदासाठी भुजंगराव कोकाटे यांची अविरोध निवड झाली.
सविस्तर वृत्त असे अंजनगाव तालुका खरेदी विक्री संघा ची निवडणूक … मार्च महिन्यांत झाली होती यामध्ये अनंतराव साबळे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल चे पंधरा संचालक निवडणूक आले होते तर विरोधी परिवर्तन पॅनल चे दोन संचालक निवडून आले होते. आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहकार पॅनल च्या उमेदवार विरोधात परिवर्तन पॅनल च्या एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सहकार पॅनलचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार अविरोध निवडण्यात आले.. यावेळी जिल्हा मध्यवर्ति बॅकेचे मा. उपाध्यक्ष तथा सहकार पॅनलचे प्रमुख अनंतराव साबळे, शशिकांतजी मंगळे, अविनाश पाटील सदार सुरेश पाटील राऊत, राजाभाऊ कळमकर, तर नवं नियुक्त संचालक नरेंद्र येवले, अंकुश सरोदे, हिम्मत ढोक, रवी पोटे, गुरुदास वानखडे, अरुण चोखंडे, गजानन दूधाट, शंतनू भांबुरकर, मोहन ठाकरे, नंदकीशीर काळे, गजानन लवटे, सौ अर्चना पंखान, सौ सपना शिंगणे, ,भुजंग कोकाटे, अरुण नवले हे उपस्थित होते तर अशोक चरपे, विकास येवले. दिपक कुलट, प्रदीप इंगळे, हरिदास वानखेडे, जयप्रकाश भगत, राजू पाटील रेचे, मोहन ठाकरे, रविंद्र राजगुरू , माधव पाटील पोटे, शिवाजी पाटील. राजेंद्र भांबुरकर, हरणे ई मान्यवर उपस्थित होते. ह्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश कुकडे यांनी तर सहकारी म्हणून काळपांडे यांनी काम पाहिले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close