सामाजिक

बालकामगार प्रथेविरुध्द जिल्हयात जनजागृती

Spread the love

भंडारा / जी.प्र.
राज्यातून बाल मजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करुन बाल मजुरांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करुन घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया मार्फत जिल्हयात जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.
बाल कामगारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणे आणि बाल मजुरांची मालकांच्या तावडीतून मुक्तता करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. 1986 च्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमानुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण परंतु 18 वर्षे पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेत कामगार ठेवल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. वीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बाल कामगार आढळून आल्यास नागरिकांनी कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रो. मो. धुर्वे यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close