शुक्रवारपासून शाळेची पहिली घंटा वाजली;अन् चिमुकल्यांचा किलबिलाट शाळा परिसरात गजबजू लागला
शाळेत येणाऱ्या नवागतांचे विविध पद्धतीनी मोठ्या उत्साहात करण्यात आले स्वागत
नव प्रहार/भंडारा (जि.प्र.)
भंडारा- उन्हाळी सुट्यांचा अवकाश संपल्यानंतर नवे शैक्षणिक सत्र शुक्रवार दिनांक ३० जून २०२३ पासून सुरु झाले असुन, भंडारा जिल्हयातील जिल्हा परिषदेसह सर्व शाळात शुक्रवारी नविन सत्रातील शाळेची पहिली घंटा वाजली, दरम्यान शाळेत येतांना विद्यार्थ्यामध्ये कमालीची उत्सुकता दिसुन आली.शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेचा पहिला दिवस ‘शाळा प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. सदर आदेशाची अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये झाल्याचे दिसुन आले.
दरम्यान दोन महीण्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शुक्रवारला शाळेची पहिली घंटा वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले. यावेळी शाळेत येणाऱ्या नवागतांचे विविध पद्धतीनी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थाचे औक्षवण तर कुठे गुलाब पुष्पवृष्टी तसेच प्रभात फेरी काढून शाळेचे नविन शैक्षणीक सत्र सुरु झाल्या -बाबतची जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात शुक्रवारला पावसाने उसंत घेतल्याने,शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.