खेळ व क्रीडा

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती कुस्त्यांची विराट दंगल सात लाखांची जंगी लयलूटः 

Spread the love
देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार
यवतमाळ (अरविंद वानखेडे) महाराष्ट्राचे सांस्कृतिक व क्रीडा वैभव असणाऱ्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धाची परंपरा कायम राखत यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्जा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी सात लाख रुपयांची जंगी लयलूट असलेल्या भव्य इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल आयोजित केली आहे. येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात दुपारी १२ वाजल्यापासून हलगी, तुतारी आणि इफ या शिवकालीन वाद्यांच्या गजरात स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
लोकमत मीडिया प्रा लि च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या मार्गदर्शनात या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होत आहेत स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून कुस्त्यांच्या
दंगलीत तब्बल सात लाख रुपयांच्या बक्षिसांची लय लूट होणार आहे हनुमान आखाड्यातील दिवंगत कुस्तीगीर पहिलवान गोकुळ वस्ताद, श्रीरामजी पजगाडे, पहिलवान भैय्यालालनी जयस्वाल, बब्बी पहिलवान, नारायणराव पजगाडे, पहिलवान नत्थूजी नासनूरकर, अब्दुल नजीर उर्फ बंठोल पहिलवान, मधुकर भेंडकर पैलवान, गजाननराव भाटवडेकर पहिलवान, शेषरावजी अजमिरे पहिलवान, शाहू पहिलवान, शेख अब्दुल पहिलवान, गजानन उजवणे पहिलवान, हिरामण यादव, सुधाकर डोईजड, गोसावी गुरुजी, परशरामजी तायडे गुरुजी, वसंतराव जोशी गुरुजी, नानासाहेब औदार्य, रामनाथजी यादव, रमेश तिवारी, राजेश दशसहस्त्र, विजय मोगरकर आदींच्या स्मृतीनिमित्त मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५१ हजार रुपये रोख व शील्ड दिवंगत सुभाषदादा बाजोरिया स्मृतीपित्यर्थ प्रशांत बाजोरिया यांच्यातर्फे दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस ४१ हजार रुपये जनता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल नारायणराव दंडे यांच्यातर्फे, तिसरे बक्षीस ३१ हजार रुपये गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को- ऑपरेटिव सोसायटी नांदेड यांच्याकडून, चौथे बक्षीस २५ हजार रुपये विलास महाजन, अध्यक्ष जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था व महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे, पाचवे बक्षीस २१ हजार रुपये विजय डांगे व धनंजय भगत यांच्याकडून, सहावे बक्षीस १५ हजार रुपये अशोक गुल्हाने
स्मृतिपित्यर्थ शैलेश गुल्हाने यांच्यातर्फे, सातवे बक्षीस १० हजार रुपये गारवा धाबा संचालक किशार चाकोलेवार यांच्याकडून, आठवे बक्षीस ७ हजार रुपये शिवदास लोखंडे स्मृतीप्रीत्यर्थ अविनाश लोखंडे यांच्यातर्फे, नववे बक्षीस पाच हजार रुपये मसुदभाई समीर एंटरप्राइजेस यांच्याकडून, दहावे बक्षीस तीन हजार रुपये गजानन उजवणे स्मृतीपित्यर्थ प्रशांत उजवणे यांच्याकडून, अकरावे बक्षीस दोन हजार रुपये पुरुषोत्तम जयसिंगपूरे स्मूर्ती सुरेश जयसिंगपूरे यांच्याकडून, बाराव्या पुरस्कारांतर्गत एक एक हजार रुपयांची दोन बक्षिसे महंमद शमी पैलवान स्मरणार्थ मोहम्मद शकील पैलवान यांचेकडून आणि प्रकाश बन्नावडे स्मरणार्थ अभिजीत बनावडे यांच्यातर्फे तर पाचशे रुपयांची दहा बक्षिसे नामदेवराव काळे यांच्याकडून दिल्या जाणार आहे. याव्यतिरिक्त 100, 200, 300, 400 आणि 500 रुपयांचे अनेक कुस्त्यांचे जोड लावून विजयी मल्लांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. कुस्त्यांच्या जोड लावण्याची जबाबदारी धनराज मिसळे, नामदेवराव काळे, रामकृष्णजी शेटे, संजय तिवारी, गौरव पाने, गौरव कटयारमल, जितू बन्नवळे, चंद्रकांत खोडकुंभे, पवन पांडे, सुजित बाकडे, अभिषेक डाबेराव यांच्याकडे राहणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कार्याध्यक्ष प्रभाकर मटलेबार, सचिव अनिल पांडे, उपाध्यक्ष कुलभूषण तिवारी, संघटक प्रतापभाऊ पारसकर, कोषाध्यक्ष अनंता जोशी, सहसचिव सुरेश जयसिंगापुरे यांनी केले आहे.
यशस्वीतेसाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य तथा यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, जाकीरभाई, हिरा मिश्रा, ओम तिवारी, शुभम लांडगे, अफसरभाई, उद्धत बाकडे, प्रदीप जयस्वाल, महंमद शकील, एडवोकेट धनंजय लोखंडे, संदीप नेवारे, सुभाष जुमळे, आनंद जाधव आदी परिश्रम घेत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close