प्रा.शैलेंद्र तेलंग यांचा सत्कार
यवतमाळ / प्रतिनिधी
संवेदना महिला संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पीएच.डी प्राप्त प्राध्यापक शैलेंद्र तेलंग यांचा सहपरिवार सत्कार केला.
शिक्षण क्षेत्रातील उच्चतम समजली जाणारी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक शैलेंद्र तेलंग यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून प्राप्त झाली आहे. त्यांचा पीएच.डी चा विषय:-“पीक विमा योजनांचा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या परिणामांचा चिकित्सक अभ्यास ” हा होता.त्यांना संशोधनासाठी डॉक्टर संतोष कुटे यांचे मार्गदर्शन लाभले होते. महाराष्ट्रातील विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुदृढ होण्यासाठी त्यांना विम्याची भक्कम आधार होतो अशा या विषयाची प्रा. तेलंग यांनी निवड केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.वर्तमान काळातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय संशोधनासाठी घेतल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
शेतकऱ्यांच्या विषयीचा शोध प्रबंध विद्यापीठात सादर करून पीएच.डी प्राप्त केल्यामुळे त्यांचा संवेदना संघटनेच्या महिलांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नलिनी सरकटे,संचालन सौ. खुशबू ठाकूर यांनी तर आभार डॉ .बाळकृष्ण सरकटे यांनी मानले.