चतुर्थ चरण राज्यस्तरीय परीक्षेत पीएम श्री नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा वडसा जुनी च्या विद्यार्थ्याचा सहभाग

गडचिरोली /प्रतिनिधी
दि. 27 फेब्रुवारी ते दि. 01 मार्च 2025 या कालावधीत चतुर्थ चरण राज्यस्तरीय चाचणी शिबिर गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे घेण्यात आले. यामध्ये पीएमश्री नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा वडसा जुनी येथील 12 कब विद्यार्थ्यांनी कब मास्टर श्री खेमराज तिघरे व शिवराम हाके यांच्या मार्गदर्शनाखाली , मुजाहिद पठाण, रामेश्वर मेंढे, राजेश मडावी, राहुल भैसारे यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापक किशोरजी चव्हाण यांच्या आर्थिक साह्यतेत सहभाग घेतला. दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी चाचणी शिबिरास सुरुवात झाली. शिबीर प्रमुख म्हणून श्री विवेक कहाळे जिल्हा संघटक यांनी काम केले. शिबिरामध्ये कब प्रार्थना, झेंडागीत, राष्ट्रध्वज माहिती, कब वंदन, नियम, वचन, ध्येय, भोजनपूर्व प्रार्थना, घड्याळावरून वेळ सांगता येणे, प्रथमोपचार, गाठी, सत्कृत्य, चित्रकला, हस्तकला तसेच कागदकाम वस्तू यावर विद्यार्थ्यांची तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेण्यात आली. श्रीमती नीता आगलावे जिल्हा संघटक (गाईड), श्रीमती कांचन दशमुखे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गाईड) यांनी शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दि. 01 मार्च, 2025 रोजी शिबिराची सांगता करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेकारिता स्काऊट मास्टर श्री विजय मुळे, कार्यालयीन कर्मचारी श्री पियुष नंदनवार, श्री प्रमोद पाचभाई व श्रीकृष्ण ठाकरे यांनी सहकार्य केले.