माजी आमदार डॉ.गिरीश गांधी यांचा २३ जुलै ला अमृतमहोत्सव
वरूड/तूषार अकर्ते
माजी आमदार तथा जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.गिरोश गांधी हे येत्या २३ जुलै रोजी वयाची ७५ वर्ष पुर्ण करित आहे. त्या निमित्ताने शहरातील रामदेवबाबा मंगलम सभागृहात २३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता अमृत महोत्सवी सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारोह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे शुभहस्ते व महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील व कृष्णा इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तिवसा मतदार संघाच्या आमदार ॲड.यशोमती ठाकुर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख राहतील.डॉ.गिरीश गांधी यांनी विविध क्षेत्रात केलेले उपक्रम तसेच अनेक क्षेत्रातील त्यांचे योगदान या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार
समारोहाचे आयोजन डॉ. गिरीश गांधी अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या अमृत महोत्सवी सत्कार समारोहाला उपस्थित राहण्याचे
आवाहन डॉ. गिरीश गांधी अमृत महोत्सव समितीचे सत्कार स्वागताध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, डॉ.अनिल बोडे, नरेशचंद्र ठाकरे, देवेंद्र भुयार, डॉ.विजय देशमुख, माधव देशपांडे, माधव देशपांडे, संयोजक के.डी.वैद्य, समन्वयक संतोष क्षिरसागर, चिटणीस प्रा.अरुण वानखडे, अनिल तालुकदार, निळकंठ आंडे, वासुदेव लांडगे, राजेश गांधी आदींनी केले आहे.