सारडा महाविद्यालयात औषधी वनस्पती व प्रोसेसिंग हर्बल प्रॉडक्टसची प्रदर्शनी –

वनस्पतीशास्त्र विभाग , वारसा एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी व कार्ड अंजनगाव यांचा संयुक्तिक उपक्रम ४०० उन अधिक विद्यार्थी व लोकांनी दिली भेट
महाविद्यालयातील औषधी वनस्पती उद्यान मध्ये जवळपास १०० उन अधिक वनस्पती आहेत त्याला आपल्या घरी लावून दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांनी उपयोग करावा
डॉ. मंगेश डगवाल विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
– स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वारसा एथनिक नॉलेज हेरिटेज सोसायटी व कार्ड अंजनगाव यांचा संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती व प्रोसेसिंग प्रॉडक्टस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व लोकांपर्यंत औषधी वनस्पतींची व त्यापासून औषधी युक्त प्रोसेसिंग हर्बल प्रॉडक्टस कसे तयार होतात याची माहिती पोहोचावी व त्याची ओळख व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनीचे उदघाटन श्री. सारडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमर सारडा , डॉ गौतम मेहेतरे प्राचार्य विद्यानिकेतन फार्मसी कॉलेज, कार्ड चे विजय लाडोळे, डॉ. बीना राठी प्राध्यापक इंग्रजी विभाग यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी उद्यानामध्ये असलेली औषधी वनस्पती याची माहिती व अशा प्रकारच्या प्रदर्शनीमुळे औषधी वनस्पतींची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकते असे सांगितले. तसेच त्यापासून कोणत्या व कशाप्रकारे विविध आजारा करिता औषधी युक्तप्रोसेसिंग हर्बल प्रॉडक्टस तयार करता येतात याचे प्रदर्शन विद्यार्थी यांनी केले सोबतच गावातील प्रतिष्ठित संस्था कार्ड व नागार्जुना आयुर्वेदिक औषधी फार्मर प्रोड्यूसर कंपनी अंजनगावसुर्जी व सुरभी स्वदेशी केंद्र अंजनगाव सुर्जी यांच्या द्वारे विविध प्रोसेसिंग हर्बल प्रॉडक्टस जसे पिंपरी पाउडर, सफेद मुसळी, तरोटा , विविध प्रकारचे चूर्ण व काढा प्रदर्शनी मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या प्रदर्शनीमध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे सादरीकरण केले यामध्ये ब्रम्ही, सकनकळी, अक्कलकाढा , इन्सुलिन प्लांट, समुद्रशोक, अश्वगंधा, सर्पगंधा, गुळवेल ,गोकर्ण ,शतावरी, खंडूचक्का, निर्गुडी,अडुळसा, पिंपरी , काळमेध, गुंज, हेटा, पिंपरी, शेवगा, इतर औषधी वनस्पतींचे वेगवेगळ्या आजारावर काय उपयोग आहे हे सांगितले.
महाविद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनीला भेट देऊन औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेतली. सोबतच प्रदर्शनीला भेट देणाऱ्या लोकांचे औषधी वनस्पतीचे रोपे देऊन स्वागत करण्यात आले व परिसरातील औषधी वनस्पती लावल्यास त्याचा उपयोग कसा घेता येईल याची सुद्धा माहिती त्यांना देण्यात आली. प्रदर्शनीला लोकजागर संघटनेचे, पतंजली चे सदस्य, श्रीमती क्रिष्नाबाई शाळेचे व विद्यानिकेतन फार्मसी कॉलेज शिक्षक व विद्यार्थी ,पत्रकार मनोहर मुरकुटे, महेश बूंदे, शहरातील पत्रकार व अंजनगाव शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी यांनी भेट दिली. प्रदर्शनीमध्ये सादरीकरण करणाऱ्या मधुन तीन उत्कृष्ठ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला याकरिता परिक्षक म्हणून डॉ. सुवर्णा झिलपे प्राणीशास्त्र विभाग व डॉ. नितीन घोडीले रसायनशास्त्र विभाग यांनी कार्य केले.
प्रदर्शनीच्या आयोजनाकरिता विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल , श्री केशव माकोडे, श्री रामचंद्र कुळकर्णी, कु. वैष्णवी
बारब्दे , अक्षय ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी श्री संतोष सरोदे, शिवनाथ इंगळे व विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.