माजी आयएएस अधिकारी यांची ती पोस्ट धक्कादायक

रेल्वेत प्रवास करतांना रेल्वेच्या टॉयलेट मध्ये बरेच काही लिहिलेले आढळते. सहसा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना रेल्वेच्या एसी कोच च्या टॉयलेट मध्ये जी पोस्ट आढळून आलीं ती धक्कादायक आहे. त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना पनवेल-नांदेड एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान एक धक्कादायक अनुभव आला. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना रेल्वेतील एका गंभीर प्रकाराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
त्यांच्या मते, पनवेल-नांदेड एक्स्प्रेसच्या एसी 2 टियर डब्यातील शौचालयाच्या भिंतीवर “गजवा-ए-हिंद २०४७” असे लिहिलेले आढळले. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले.
अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा देश “विकसित भारत २०४७” च्या स्वप्नाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा अशा प्रकारच्या घटना समाजात संभ्रम आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करू शकतात. त्यांनी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विश्व मित्र आज आणि विश्व गुरु उद्या
तसेच, सर्वसामान्य नागरिकांनीही सजग राहून अशा घटनांविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी “उद्दिष्ठत जाग्रत प्राप्यवरान् निबोधत” (उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका) असे म्हणत देशाच्या एकजुटीचे आणि समृद्धीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
या पोस्टमध्ये त्यांनी “भारत माता की जय, समर्थ भारत, श्रेष्ठ भारत, विश्व मित्र आज आणि विश्व गुरु उद्या” अशी घोषणाही दिली आहे.
तपासणी होईल का?
त्यांनी रेल्वे प्रशासनाला प्रश्न केला की, अशा गोष्टींची तपासणी होईल का आणि समाजाने यावर काय भूमिका घ्यावी? हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर संताप आणि चिंता व्यक्त केली आहे.
काहींनी अशा कृत्यांमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवरूनही चर्चा सुरू झाली आहे.
गजवा-ए-हिंदमध्ये गजवा म्हणजे “इस्लामचा प्रसार करण्यासाठी युद्ध”. या युद्धात सहभागी असलेल्या इस्लामिक सैनिकांना “गाझी” म्हणतात. व्यापक अर्थाने, गजवा-ए-हिंद म्हणजे युद्धाद्वारे भारतात इस्लामची स्थापना करणे. गजवा-ए-हिंद म्हणजे भारतीय सत्तेवर विजय मिळवणे आणि लोकांना इस्लाममध्ये रूपांतरित करणे. याचा अर्थ जगाच्या या भागात राहणाऱ्या लोकांशी युद्ध करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गजवा-ए-हिंद म्हणजे युद्धाद्वारे भारत जिंकणे आणि त्याचे इस्लामीकरण करणे.