शाशकीय

मनरेगा कामात भंडारा राज्यातून प्रथम

Spread the love

 

१३९२ कामावर ८० हजाराहून अधिक मजुरांची उपस्थिती…

भंडारा/जि.प्र

ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा रोजगार देणारी महत्त्वाची योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. मनरेगा योजनेची भंडारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू असून आज मजूर उपस्थितीमध्ये राज्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. जिल्हयातील सर्व सातही तालुक्यात मनरेगाच्या विविध कामावर तब्बल ८० हजार५३२ मजूर काम करत आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत सर्व कामांचे नियोजन या आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच केले असून वार्षिक नियोजन आराखडा सर्व व्यापक बनवण्यावर भंडारा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यामध्ये मजुरीसाठी होणारे स्थलांतरण मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीने कमी झाले आहे. कठीण काळात नियमित रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर व्हावी यासाठी मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त काम घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.कुंभजेकर यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील 546 ग्रामपंचायत पैकी 321 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेतून विविध कामे सुरू आहेत. त्यामध्ये या योजनेच्या अंमलबजावणी- मध्ये आज ८० हजार ५३२ मजूर उपस्थिती नोंदविण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून 1392 काम सुरू आहेत. कार्यरत मजुरांची मस्टर पारदर्शक पद्धतीने ठेवण्यात येत असून मनरेगा अंतर्गत मत्ता निर्मिती करण्यात येत आहे.कार्यरत मजुरांना आठ दिवसात मजुरी मिळत आहे. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारचे कामे हाती घेतल्या जातात. यामध्ये भूमिहीन, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी, शेततळे ,फळबाग बंदिस्ती , पांदण रस्ते, वृक्ष लागवड अशी विविध कामे केली जात आहेत. नुकतीच जिल्हाधीकाऱ्यांनी या कामांना भेट देवून पाहणी केली.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मनरेगाची काम सुरू असुन नोंदणीकृत मजुरांव्यतिरिक्त काम मिळविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी त्वरित जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

 

तालुका निहाय कामांची संख्या व मजुरांची संख्या पुढील प्रमाणे _

भंडारा 238 कामावर 7924 मजूर, लाखांदूर तालुक्यात 128 कामांवर 9723, लाखनी तालुक्यात 152 कामांवर 11 हजार 617, मोहाडी तालुक्यात 288 कामांवर 19121, पवनी तालुक्यात 53 कामांवर 5050, साकोली तालुक्यात 226 कामांवर 21682, तुमसर तालुक्यात 307 कामांवर 5415 मजूर कार्यरत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close