हटके

तरुणींच्या रक्ताने आंघोळ करणारी महिला सिरीयल किलर

Spread the love

       सिरीयल किलर च्या बाबतीत आपण नेहमीच ऐकत अथवा वाचत असतो. हे लोक इतके सायको असतात की कुठलेही कारण नसतांना ते निष्पाप लोकांचे बळी घेतात. यापैकी काही तर इतके क्रूर आणि निर्दयी असतात की त्याच्या हातून घडलेल्या घटनेविषयी ऐकले तर अंगावर शहारे उभे राहतात. आज आपण अशाच एका महिला सिरीयल किलर बद्दल माहिती बघणार आहोत.

इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी विचित्र गुन्हे केले. आज आपण अशाच एका महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत. फार पूर्वी या महिलेने कितीतरी लग्न न झालेल्या तरूणींची हत्या केली. बरं तिने या तरूणींची हत्या का केली याचं कारण तर आणखीच धक्का देणारं आहे.

इतिहासातील सर्वात क्रूर महिला सीरियल किलर

एलिझाबेथ बाथरी असं या क्रूर महिलेचं नाव होतं. अनेक हायप्रोफाइल केसेसबाबत आपण ऐकत असतो, तशीच काहीशी ही केस. ही महिला किती क्रूर होती याचा अंदाज आपण यावरून लावू शकता की, या महिलेला इतिहासातील सर्वात कुख्यात आणि निर्दयी महिला सीरिअल किलर म्हणून ओळखलं जातं. काळ होता १५८५ ते १६१० दरम्यानचा. इतक्या वर्षात एलिझाबेथने तब्बल ६०० हून अधिक तरूणींचा जीव घेतला होता. पण तिची क्रूरता इथेच थांबली नाही तर या तरूणींच्या रक्ताने तिने आंघोळ सुद्धा केली.

उच्चभ्रू परिवारातील सायको

एलिझाबेथने असं का केलं? असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेल. त्याआधी ती कोण होती हे जाणून घेऊया. एलिझाबेथ हंगरी साम्राज्यातील उच्चभ्रू बाथरी परिवारातील होती. तिचं लग्नही झालं होतं. फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं. एलिझाबेथचा पती तुर्कीसोबत झालेल्या युद्धातील हंगरीचा नॅशनल हिरो होता.

असं सांगितलं जातं की, एलिझाबेथ आधी तरूणींना शारीरिक त्रास देत होती. शेवटी त्यांची हत्या करून त्यांचं रक्त एका टबमध्ये भरून त्यात आंघोळ करायची. याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे एलिझाबेथ बाथरीचा पती जिवंत होता, तेव्हाही ती तरूणींना तिची शिकार बनवत होती. पण १६०४ मध्ये त्याच्या मृत्युनंतर तिने जणू हत्या करण्याचा सपाटाच लावला होता. एलिझाबेथ स्लोवानियाच्या चास्चिस येथील तिच्या महालात राहत होती. तिथेच ती या तरूणींची हत्या करत होती.

असंही सांगितलं जातं की, एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयानक गुन्ह्यात तिचे तीन नोकर मदत करत होते. ती एका उच्चभ्रू परिवारातील होतील म्हणून ती आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींना चांगले पैसे देऊन कामाचं आमिष दाखवून महालात बोलवत होती. पण या तरूणी महालात येताच तिच्या शिकार ठरत होत्या.

पुढे कालांतराने जेव्हा आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींची सख्या कमी झाली तेव्हा तिने श्रीमंत घरातील मुलींना आपली शिकार बनवणे सुरू केलं होतं. ही बाब जेव्हा हंगरीच्या राजाला समजली. त्याने लगेच या गोष्टीची चौकशी करण्याचा आदेश दिला. तेव्हा पूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. चौकशी करणाऱ्या पथकाने एलिझाबेथच्या महालातून मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले होते.

रक्ताने आंघोळ का करायची?

१६१० मध्ये एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयंकर कृत्यासाठी अटक करण्यात आली आणि तिला तिच्याच महालातील एका खोलीत कैद करण्यात आलं. तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचा मृत्यू झाला. असंही म्हणतात की, एलिझाबेथ फार सुंदर होती आणि तिला तिचं हे सौंदर्य कायम टिकवायचं होतं. या कारणानेच तिने ६०० तरूणींची हत्या केली होती. तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी ती त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close