आयटी कंपनी लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात महिला मास्टर माईंड

नाशिक / विशेष प्रतिनिधी
अशोक खरात याला देखील बाजूला ठेवणाऱ्या आयडी कंपनीत धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात हादरवणारे खुलासे होत आहेत. या सगळ्या मागे एक महिला मास्टर माईंड असल्याचे बोलल्या जात आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कर्मचाऱ्याला कंपनीतून तूर्त निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणातही एसआयटी तपास कर असून त्यांच्याकडून कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसंच संशयीत आरोपींची बॅक हिस्ट्री जमा केली जाते आहे. त्यापूर्वी या प्रकरणात या नव्या खुलासामुळे तपासाला वेग आला आहे.
कोण आहे महिला मास्टरमाइंड?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला मास्टरमाइंडचं नाव निदा खान असं आहे. तिच्यावर गुन्हा नोंद होण्यापूर्वीच तिने नाशिकमधून पलायन केलं होतं. ती मूळची नाशिकचीच आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिने काहीच महिन्यांपूर्वी नाशिक कंपनीतून मुंबईत बदली करुन घेतली. पोलिसांनी निदा खान अटक केली. निदा खानसह पोलिसांनी दानिश शेख, तौसिफ अत्तारला अटक केली आहे. आरोपींनी नोकरीसाठी भरलेल्या इंटरव्ह्यू फॉर्ममधील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी पदोन्नती आणि पगारवाढीचे आमिष दाखवून, तसंच काही प्रकरणांत ब्लॅकमेल करून महिलांचे शोषण केलं. तपासादरम्यान धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोपही समोर येत असून, एसआयटी त्या दिशेने कसून चौकशी करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे मार्च 2026 मध्ये पहिला एफआयआर दाखल झाली. त्यात नंतर अनेक तक्रारी समोर आल्यात. छळ, जबरदस्ती आणि तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप . पीडितांनी केला आहे. अनेक महिला कर्मचारी आणि किमान एका पुरुष सहकाऱ्याने वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः टीम लीड्सच्या एका गटाकडून सतत होणाऱ्या छळाचा आरोप केल्या आहेत.
दरम्यान तक्रारदारांनी वारंवार अयोग्य स्पर्श, अश्लील टिप्पणी, विनयभंग आणि काही प्रकरणांमध्ये, लग्नाच्या खोट्या आश्वासनांखाली शारीरिक संपर्क साधल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि मुस्लिम धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही या तक्रारीमध्ये उल्लेख आहे. काहींनी तर त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न झाल्याचाही आरोप या तक्रारीतून केला आहे.




