महिला शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
देवगाव येथील घटना
अंजनगावसुर्जी ता.२२
तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी शेतकरी महिलेने सोमवारी (ता.२२) गावालगत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले शारदा प्रशांत खारोडे वय ४० रा.देवगाव असे तिचे नाव असून दोन एकर कोरडवाहू शेती व एक एकर सासऱ्याची कोरडवाहू असलेल्या शेतात शारदा ने परिवाराचा गाडा चालावतांन आर्थिक विवंचना निर्माण होत असल्याने तिने जीवन संपवले असावे असे तिच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले
********** २०१९ मध्ये पती प्रशांत यांचे दुर्धर आजाराने निधन झाले त्यामुळे परिवाराची जबाबदारी आली दोन मुले सागर वय १७ आणि युग वय १४ शारदा हिच्या नावाने सासन रामापूर ता.दर्यापूर येथे दोन एकर कोरडवाहू शेती असून पिकांची परिस्थिती वाईट घरी देवगाव येथे सासऱ्याच्या नावाने एक एकर कोरडवाहू शेती त्यातही पिकांची स्थिती वाईट असल्याने परिवाराचा गडा चालवणे मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यात सतत ची नापिकी यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे परिवारातील सदस्यांनी सांगितले
शारदा हिने सोमवारी (ता.२२) सकाळी सात वाजता गवाशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला