सोयाबीन चे दर हमी पेक्षा कमी शेतकरी करणार पेरा ही कमी
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
सोयाबीन ला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन पेक्षा ईतर पिक घेतलेले बरे असा सुर निघत घाटंजी तालुक्यात गत दोन वर्षांमध्ये सोयाबीन चा पेरा कमी होत असल्याचे दिसत आहे. हमीदरापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने सोयाबीन चा उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने यंदा सोयाबीन पेरणी कडे शेतकरी पाठ फिरवण्याची शक्यता दिसून येते असून मागील दोन वर्षांमध्ये शेतक-यां जवळ माल नसतांना सोयाबीन ला चांगला दर मिळाला गतवर्षी सुध्दा सोयाबीन ला सात हजार पर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी सोयाबीन चा पेरा वाढवला होता बाहेर राज्यात पिकलेल्या सोयाबीन मुळे याचा फटका भाववाढीला बसला आहे यंदा तर हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्याने उत्पादन खर्च व उत्पादीत झालेल्या शेतीमालाला भाव यामध्ये ताळमेळ जुळत नसल्याने यंदा सोयाबीन पिकाच्या पेरणी कडे पाठ फिरवणार असल्याची शक्यता दिसते. तूर कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांनी या पिकाच्या पेरणी कडे कल देण्याची चित्र दिसत आहे. यामुळे यंदा सोयाबीन चा पेरा घटणार अशी चर्चा शेतक-यांमध्ये ऐकायला येत आहे.