सामाजिक

कोमामध्ये (Coma) गेलेला रुग्ण होमिओपॅथीक उपचाराने अवघ्या ७२ तासात बरा झाला.

Spread the love

 

यवतमाळ प्रतिनिधी:-होमिओपॅथीक उपचाराने जवळपास १ महिन्यापासून कोमामध्ये असणारा १६ वर्षीय अतिफ शेख बरा झाला व आपले जीवन व्यतीत करु लागला. होमिओपॅथीने असाही चमत्कार होऊ शकतो याचा आपण अंदाजही घेवू शकत नाही मात्र त्यांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे.

सविस्तर वृत्त असे की, पांढरकवडा निवासी १६ वर्षीय मोहम्मद अतिफ शेख हा लहानपनापासूनच डोअर ( Door) सिंड्रोम या नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता. त्यासाठी औषधोपचार तर त्याला बालपणापासूनच चालू होता. अतिफला २०२३ मे महिन्यापासून ताप येत होता. नियमीत औषध घेऊनही तापाचा चढउतार चालूच होता. मात्र ताप काही कमी होत नव्हता.

त्याची शारिरीक अवस्था खालावत चालली होती म्हणून त्याला बालरोगतज्ञांकडे अॅडमिट करण्यात आले. तो औषधानांही खूप Respose करत नव्हता त्यानंतर तो कोमामध्ये गेला. डॉक्टरांनी त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र तो जवळपास १ महिना पुर्णपणे कोमामध्ये होता.

अशातच अतिफच्या कुटूंबियांना मि. साजीद फरहाद यांच्याकडून डॉ. विनायक राठोड एम. डी. (होमिओपॅथी) यांचा पत्ता मिळाला.
मि. फरहाद यांनी डॉ. विनायक राठोड यांच्याशी फोनवरूनच संपर्क साधला आणि अतिफच्या आजाराची व परिस्थितीची कल्पना दिली.
डॉ. राठोड यांनी अतिफचा व्हिडीओ बनवून आणा व त्याचे सर्व रिपोटर्स घेऊन त्याची संपुर्ण माहिती दिली.
दि. ६ जून २०२३ ला अतिफचे वडिल व्हिडीओ घेवून क्लिनीकला आले व त्यांनी अतिफ बद्दलची संपुर्ण माहिती दिली. डॉ. राठोड यांनी व्हिडीओ बघीतला व त्याच्या सर्व रिपोटर्सचा सखोल अभ्यास केला व अतिफसाठी त्यांच्या वडिलांकडे औषध दिले. पुढिल ३ दिवसातच ९ जून २०२३ रोजी त्याच्या हातांच्या बोटांमध्ये हालचाल दिसू लागली. दिवसेंदिवस १-१ हालचाली वाढू लागल्या पायाची हालचाल होऊ लागली. जसे शेकहॅन्ड करणे. तो आवाजाला प्रतिसाद देऊ लागला. पायाची हालचाल करू लागला.त्याची भुकही वाढली तो तसा तसा कोमामधून बाहेर येऊ लागला.
तो पूर्ण कोमामधून बाहेर आल्यावर अतिफ त्याच्या कुटूंबियासोबत २० जून २०२३ रोजी स्वतः दवाखान्यात आला. त्याच्या कुटूबियांच्या आनंदाला तर पारावरच नव्हता.
अतिफची सुरुवातीची अवस्था व आताची परिस्थिती पाहिली असता एकच निष्कर्ष निघतो की होमिओपॅथिला प्रथम प्राधान्य देवूच शकतो. सर्व आशा संपल्यावर आणण्यापेक्षा सुरुवातीपासूनच आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी निवडू शकतो. होमिओपॅथीने व डॉ. विनायक राठोड यांनी आपल्याला हे वांरवार सिद्ध करुन दाखवले आहे.
सर्व आजारामध्ये उपयोग घ्यावा व आरोग्यदायी जीवन जगावे असा सल्ला डॉ. विनायक राठोड यांनी या पत्रकार परिषदेत दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close