सुविधा अभावी पारधी समाजातील महिलांनी घातला ग्रामपंचायतला गराडा
पोलिसांचा तगडा बंदोबस्त,वरिष्ठ अधिकारी दाखल.
नेर:- नवनाथ दरोई
नेर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अजंती ग्रामपंचायतला पारधीबेडा वरील महिलांनी गराडा घातल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. आजंतीला एका बाजूने गट नंबर 19 मध्ये 56 कुटुंब राहतात असून गट क्रमांक 22 मध्ये 65 कुटुंब वास्तव्यास आहे. ग्रामपंचायत सभेच्या मिटिंगमध्ये दुसऱ्या बाजूने वास्तव्यात असलेल्या कुटुंबीयांचे घरकुल मंजूर करून देतात. आठवड्यातून तीन वेळा पाणी देतात, त्यांना शासनाच्या योजनेचे लाभ दिल्या जाते. परंतु दुसऱ्या बाजूने असलेल्या पारधीबेडावर राहणाऱ्या पारधी समाजाला यापैकी कुठल्याही प्रकारची सुविधा गेल्या 30 वर्षापासून मिळत नसल्याचे तेथील पारधी समाजातील महिलांनी कथन केले. पारधी समाजाच्या कूटूंबियांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा तसेच ग्रामपंचायत कडून, मुलांना शिक्षण मिळावे, वेळेवर स्वच्छ पाणी मिळावे या मागण्यासाठी पारधी महिला रस्त्यावर उतरून सरपंच उपसरपंच सचिव यांना कोडीस पकडले.ही ग्रामपंचायत एकास सुविधा तर दुसऱ्याची ऊपेक्षा करत असल्यामुळे आज आम्ही महिलांनी ग्रामपंचायतला घेराव घातला आहे. इतराप्रमाणे आम्हाला सुविधा मिळाली नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असे तेथील पारधी समाजातील महिलांचे म्हणणे आहे. या भागातील शांतता भंग होऊ नये म्हणून नेर तहसीलचे नायब तहसीलदार प्रवीण इंगोले, नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंच, कोतवाल मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते.