हटके

अभियंता मुलावर वरात परत नेण्याची आली वेळ 

Spread the love

फारुखाबाद / नवप्रहार डेस्क

              देशात मुलं आणि मुलींच्या प्रमाणात तफावत असल्याने अनेक राज्यात मुलांना मुली मिळणे कठीण होऊन बसले आहे.शिवाय मुली  उच्च शिक्षण घेत असल्याने त्यांच्या मुला बद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा मुलांवर मुलीच्या घरून वरात परत घेऊन येण्याची नामुष्की ओढवत आहे. मुख्य म्हणजे  दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातल्यावर सप्तपदी पूर्वी हा प्रकार घडला. .

 या बद्दल मिळालेली माहिती अशी की , वधूला आधी सांगण्यात आलं की वराला सरकारी नोकरी आहे, पण वर प्रायव्हेट इंजिनिअर आहे. वधूला समजताच तिने लग्नास नकार दिला. दोन्ही बाजूच्या लोकांनी वधूला समजावलं, पण ती लग्नासाठी तयार झाली नाही.

सरकारी क्लार्कच्या मुलाच्या लग्नाची वरात फारुखाबादला आली होती, त्याचं लग्नाच्या मंडपात मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली आणि सुरुवातीचे विधी पार पडले. एकमेकांना हार देखील घातला. याच दरम्यान कोणीतरी वराला जाब विचारला आणि एकच गोंधळ उडाला.

मुलीच्या बाजूच्या लोकांनी मुलाच्या वडिलांकडे वराच्या नोकरीबद्दल विचारपूस केली आणि त्यांनी आपला मुलगा सिव्हिल इंजिनिअर असल्याचं सांगितलं. याबाबत नववधूला समजल्यावर ती म्हणाली की, तिला सरकारी नोकरी असलेला वर आहे. ती खासगी नोकरी असलेल्या कोणाशी लग्न करणार नाही. हे ऐकून दोन्ही बाजूचे लोक अवाक झाले व नववधूला समजावण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु वधूने कोणाचंही ऐकले नाही

ही बाब नववधूला समजल्यावर त्याने फोनवरून आपली पे स्लिप मागवली आणि वधूच्या बाजूच्या लोकांना दाखवली, त्यात महिन्याला १ लाख २५ हजार रुपये पगार लिहिला होता. असं असूनही, वधू ठाम होती आणि तिने लग्न करण्यास पूर्णपणे नकार दिला. नंतर समाजातील लोकांनी दोन्ही पक्षांकडून होणारा खर्च वाटून घेण्याचं ठरवलं. यानंतर नवरदेव वधूशिवाय घरी परतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close