सामाजिक

नामदेवराव विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान

Spread the love

 

भंडारा ( प्रतिनिधी) नामदेवराव विद्यालय घाणोड येथे अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर व्याख्यान घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील मुख्याध्यापक नरेश रामटेके होते तर प्रमुख वक्ते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी तर साकोली तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी, कविता मडामे त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच आशा लाडे, गजानन डोंगरवार, पोलीस पाटील के आर बडोले ,प्रशांत लाडे ,निशांत मेश्राम ,गोपीनाथ बोरकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कागदराव रंगारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वर गीत सादर करून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चळवळीमध्ये येण्याविषयीचे गीत सादर केले त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी सांगितले की आपल्या देशात आजही विज्ञान व कम्प्युटरच्या युगात आजही बुवा बाबाच्या टी व्हि च्या माध्यमातून अंधश्रधा वाढविण्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो विविध प्रकारच्या लाकेट घेतल्याने आपला रोग दूर होते आपला घर शांत राहतो घरात शांती राहते असं सांगून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य विकण्याचा काम आणि गोरख धंदा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे कोणता यंत्र आणि लाकेट घेतल्याने रोग दुरुस्त होत नाही हा सर्व लुबाडण्याचा प्रकार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे त्याचप्रमाणे आजही खेड्यापाड्यांमध्ये बुवा बाबा रुग्णांना तपासतात राग देतात लिंबू भरून देतात व रोग दुरुस्त होण्याच्या दावा करतात असेही प्रकार आजी खेड्यापाड्यात सुरू आहे त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने चाळीस वर्षापासून मंत्र तंत्र, जादूटोणा, भूत ,भानामती मंत्र तंत्र ,चमत्कार देवी अंगात येणे हे जर कोणी सिद्ध करून देत असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 30 लाखाचा बक्षीस देण्यात येते असे आव्हान सभेतून करण्यात आले जर टेबल ठेवलेला भाजलेला पापड जरी मंत्राने फोडून दिला तरी समितीतर्फे त्यांना 30 लाखाचे बक्षीस देण्यात येईल दारूचे रूपांतर पाण्यात व पाण्याचे रूपांतर दारूत आणि खिशामध्ये असलेल्या नोटेचा नंबर जरूर ओळखून देत असेल तर समितीतर्फे तीस लाखाचा बक्षीस देण्यात आव्हान असे मत डी जी रंगारी यांनी आपल्या व्याख्यानातून केला तसेच विविध प्रयोग दाखवून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे काम त्यांनी केले त्याचप्रमाणे कागदराव रंगारी यांनी मंत्राने मारणारा हा हा गीत सादर केला त्याचप्रमाणे विविध प्रयोग सादर केले त्यामध्ये जळता कापूर तोंडात टाकने, तांदळाने भरलेला लोटा पेचकस ने उचलणे, पत्त्यांचे कलर बदलविणे ,लिंबूतून रक्त काढणे, बिना माचीस आग पेटवणे, टेनिस बॉल गायब करणे, कानाने चिट्या वाचणे, तोंडातून ब्लेड काढणे असे विविध प्रयोग सादर करून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन निशांत मेश्राम यांनी केले आभार बडोले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आर बी देशपांडे ,डी एम मानकर, टी एस मस्के, बी बी मेश्राम ,काजल राऊत ,कादंबरी लाडे ,तुषार काणेकर व इतर सर्व शिक्षक व शिक्षक एकत्र कर्मचारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्यान व प्रयोग शांतचिताने ग्रहण केले व क कार्यक्रमात सहभाग दर्शविला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close