कुठल्याही क्षणी होऊ शकते युद्ध संपवण्याची घोषणा

वॉशिंग्टन /नवप्रहार डेस्क
ईरान – अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने भयंकर रूप धारण केले आहे. या युद्धात इस्त्रायल कडून सहभाग घेतलेल्या अमेरिकेला ईरान इतकी कडवे आव्हान देईल याची कल्पना नव्हती. ईरान ने जगाला तेल आणि गॅस पुरवठा करणारी हिर्मुज खाडी बंद केल्याने जगात कच्चा तेल आणि गॅस चू तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हे युद्ध थांबवावे अशी मागणी जास्तीत जास्त देशांकडून होत आहे. त्यामुळे इतर देशांचा वाढता दबाब पाहता अमेरिका ही युद्ध थांबवण्याची घोषणा करु शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आखात थांबली आहे. तेल रिफायनरी आणि गॅस प्र्कल्पांवरही मोठे हल्ले होताना दिसत आहेत. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. आम्हाला इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा कोणताही फटका बसणार नाही असा दावा करणाऱ्यांनाच या युद्धाचा सर्वाधिक फटका बसला.जगातून हे युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच आता युद्ध थांबवण्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. एका तासात त्यांनी युद्धाबाबत वेगवेगळी दोन विधाने केली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबद्दल थेट म्हटले की, मला वाटते की, आता युद्ध संपले पाहिजे. इराण देखील हे युद्ध संपवण्याचा विचार करत आहे. अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या खूप जवळ नक्कीच पोहोचली आहे. अमेरिका इराण युद्धातील आपली लष्करी कारवाई कमी करण्याचा विचार करत असल्याचे अत्यंत मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानामुळे थेट संकेत मिळत आहेत, की इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही क्षणी थांबू शकते. 28 फेब्रुवारी 2026 नंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबद्दल भाष्य केले. या युद्धामुळे जगातील अनेक देश जैरीस आले. जगाला याचा फटका बसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. यामुळे अनेक देशात कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक तासापूर्वी अगोदर हे विधान करण्यापूर्वी म्हटले की, आपण बोलू शकतो, पण मला खरोखरच युद्धविराम नको आहे. दुसरी बाजू उद्ध्वस्त करत आहोत, तेव्हा युद्धविराम चालत नाही. मुळात म्हणजे आम्ही तसा विचारही करत नाहीत. या युद्धात अमेरिका मजबूत स्थितीत आहे, इराणची खूप जास्त नुकसान होत असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. पहिल्यांदा युद्ध थांबवायचे नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आणि दुसऱ्यांदा बोलताना एका तासानंतर युटर्न घेत युद्ध थांबलण्याबद्दल भाष्य केले.




