सामाजिक

वर्धा नदीत बुडालेल्या चौघांचे मृतदेह मिळाले

Spread the love

वणी: / प्रतिनिधी
वणी तालुक्यातील वर्धा नदीवर सहलीसाठी आलेल्या इसमांचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडवून मृत्यू झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली.
शहरा लगत असलेल्या नायगाव खु.येथील पाच ते सहा जण वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता प्रविण सोमलकर,(३६) दिपक कोसुरकर,(४०) हे दोघे नदीपात्रात वाहून गेले. १५ ऑगष्ट रोजी सायंकाळ पर्यंत शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
आज १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोघांचे मृतदेह काही अंतरावर मिळून आले.
दुसऱ्या घटनेत शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जुनाड येथील वर्धा नदी पात्रात दोन तरुण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोन तरुण वाहुन गेले होते. रितेश नथ्थु वानखेडे १८ व आदर्श देवानंद नरवाडे २० दोघेही भद्रावती जिल्हा.चंद्रपूर असे वाहुन गेलेल्या तरूणाचे नाव आहे. आज १६ ऑगस्ट रोजी दुपारी त्या चौघांचेही मृतदेह आढळून आले.
त्या चौघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविच्छेदना करीता दाखल करण्यात आले होते.शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close