दलितवस्तीमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत
बिलोली (प्रतिनिधी):
गंजगाव येथील ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यामुळे चार दिवसांपासुन मागासवर्गीय वस्ती मधील नागरिक अंधारात होते. नागरिकांच्या निवेदनामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महावितरण कार्यालयाचे अधिकारी कामाला लागले व गावात विद्युत रोहीत्र बसवण्यात आले.
कुंडलवाडी पासुन जवळच असलेलं गंजगाव हे गाव चार दिवसांपासून अंधारात होते, साप्ताहिक नव प्रहार आधी त्याची दखल घेतली होती.
तालुक्यातील गंजगाव गावात विजपुरवठा सुरु करण्यासाठी कुंडलवाडीचे कनिष्ठ अभियंता, लाईनमन महावितण विभागाचे जेई यांना दलीत वस्तीतील नागरिक फोनद्वारे घडलेला प्रकार सांगल्या नंतर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करुन विद्युत रोहीत्र बसवण्यात आले आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांचे योगदान आहे.
विजपुरवठा सुरळीत नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावातील नागरिकांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला दिल्या नंतर गंजगावात दलित वस्ती मध्ये विद्युत पुरवठा सुरळीत चालू झाला असून गावासाठी व गावच्या सर्वांगीण विकासाचे हे पाऊल गावकऱ्यांनी बजावले आहे.