शाशकीय

यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय आजारी ? 

Spread the love
 शासकीय रुग्णालयात रुग्णांची हेळसांड 
नातेवाईकांचे होतात हाल
 यवतमाळ वार्ता
 अरविंद वानखडे
                जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ज्या शासकीय रुग्णालयावर आहे तेच आजारी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. आणि त्या सोबत नातेवाईकांचे देखील हाल होत आहे.
                      स्व. वसंतराव शासकीय रुग्णालय जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आजारी असलेल्या रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी असताना येथे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड तर होतेच शिवाय नातेवाईकांना तरस सहन करावा लागतो तो वेगळा .
 पहूर येथील इंदुबाई महाजन या त्यांच्या पायावर सुजन आल्याने त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते  रुग्ण यवतमाळ रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत असताना त्यांची प्रकृती बरी होत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करण्याचे ठरविले. त्यांच्या  वयाचा विचार करता आणि त्यांच्या पायाला त्रास असल्याने त्यांना व्हील चेअर वरून नेणे आवश्यक होते. नियमानुसार या रुग्णालयात भरती रुग्णांना सुविधा देण्याची जबाबदारी ही येथील कर्मचाऱ्यांची असते. त्यांना व्हील चेअर वर त्यांच्या वाहना पर्यंत सोडण्याची जबाबदारी वॉर्ड बॉय ची होती. पण हे काम त्यांच्या नातेवाईकांनाच करावे लागले.
              रुग्णांच्या सेवेसाठी असलेलं उदवाहन (लिफ्ट ) देखील मागील काही काळापासून बंद आहे. त्यामुळे  रुग्णांसाह त्यांच्या नातेवाईकांना कमालीचा त्रास होत आहे. याकडे येथील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close