विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार,सुट्टीच्या दिवशीही कार्यालयातील पंखे,लाईट सुरूच
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याचा खुर्चीला दिले निवेदन, अनेक शेतकरी उपस्थित,
नेर:- नवनाथ दरोई
नेर तालुक्यात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने,भारतीय जनता पक्षाच्या वतीने, वीज वितरण कंपनीचे उप-अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता. शनिवारला सुट्टी असल्यामुळे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नोव्हतेच. परंतु कार्यालयातील सर्वच पंखे लाईट सुरुच होते. कार्यालयात उप-अभियंता नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकून दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की, महावितरणाच्या या कार्यप्रणालीमुळे जनता त्रस्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाल्याची लागवड केली आहे. शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु दिवसातून दोन-तीन तासात वीज पुरवठा होत असल्यामुळे भाजीपाला वाळत आहे. मिरगाचा पासून एक महिना पाऊस उशिरा आल्याने, पेरणी उशिरा करण्यात आली. पेरणीनंतर जुलैमध्ये ढगफुटी झाल्याने हजारो हेक्टर वरील पिके अक्षरक्ष: उध्वस्त झाली. कुठे कुठे जमीन खरडून गेली तर कुठे वाहून गेली. तरीही शेतकऱ्यांना नव्या उमिदीने कामाला लागले. डवरणी,निंदन, खते देऊन झाली. मात्र आता पाऊस गायब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पावसाच्या विलंबनावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची व्यवस्था केली. सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके जगवलीत. मात्र आता महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे वीज पुरवठा सतत खंडित राहत असल्याने. सिंचनही करणेकठीण झाल्याने शेतातील उभे पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाळत आहे. महावितरण कंपनीने सुरक्षित वीजपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिला. खुर्चीला निवेदन देतेवेळी भाजपाचे नेर तालुका अध्यक्ष अनिल राठोड,पंजाब शिरभाते,बंडू श्रीराव,संतोष देशमुख, गौरव राऊत, प्रितम गावंडे, आशिष खोडे,केतन गुल्हाने,सोनाली गुल्हाने,मिनाक्षी नगारे, रवी राठोड ,संतोष अबूलकर,राजेश गुगलीया,वैभव धोटे,सचिन कराळे,दिनेश दावडा,दिनेश पांगारकर ज्ञानेश्वर भाकरे व अन्य शेतकरी ऊपस्थीत होते.