सामाजिक

जळगाव आर्वीत गॅस गळती मुळे लागलेल्या आगीत  कुटुंबातील 4 इसम होरपळले ; आर्थिज नुकसान

Spread the love
मुरली भाकरे याच्या घरी घडली घटना 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
                   गॅस गळती मुळे लागलेल्या आगीत कुटुंबातील 4 लोकं होरपळल्याची घटना तालुक्यातील जळगाव आर्वी येथे घडली आहे. यात मदतीसाठी धाव घेणाऱ्या महिलेचा अस्थिभंग झाल्याने त्यांना सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले आहे. तर ईतर 3 जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
             प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जळगाव आर्वी येथे भाकरे कुटुंब वास्तव्यास आहे. नेहमी प्रमाणे संध्याकाळी 7.30 च्या सुमारास रेखा मुरली भाकरे या कुटुंबासाठी स्वयंपाक तयार करीत होत्या.दरम्यान गॅस गळती झाल्याने अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे घाबरलेल्या रेखा भाकरे या मदतीसाठी आरडाओरड करत बाहेर पळाल्या.  यावेळी पती मुरली भाकरे हे बाहेर बसले असल्याने त्यांनी काय झाले हे पाहण्यासाठी  स्वयंपाक घराकडे धाव घेतली.
                      आवाज ऐकून घरापासून काही अंतरावर असलेल्या मोठा मुलगा सागर भाकरे आणि अनिकेत भाकरे यान ही बाब समजताच त्यांनी सुद्धा घराकडे धाव घेत स्वयंपाक घर गाठले. दरम्यान आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती. आगीचे रूप पाहता कोणीही घरात घुसण्याची हिम्मत दाखवली नाही.
पाय घसरल्याने रेखा भाकरे यांचा अस्थिभंग – अचानक लागलेल्या या आगीमुळे स्वयंपाक करीत असलेल्या रेखा भाकरे या मदतीसाठी बाहेर धावत येत असताना घराच्या पायरीवर त्यांचा पाय घसरल्याने त्या पडल्या त्यात त्यांच्या कमरेला फॅक्चर झाल्याचे समजते. त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे हलविण्यात आले आहे.
तीन पुरुष होरपळले –  गॅस गळती झाल्याने उडालेल्या भडक्यामुळे किचन मधील सामानाने पेट घेतल्याने आत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे  स्वयंपाक घरात असलेल्या फ्रीज पासून तर भांडे आणि कपाट जळून खाक झाले. त्यात मुरली भाकरे मुरळी यांचा मोठा मुलगा सागर आणि लहान अनिकेत भाजले. यापैकी अनिकेत हा जास्त प्रमाणात होरपळला आहे.
छत आणि टाईल्स ला तडे – गॅस गळती मुळे झालेल्या स्फोटामुळे छताला आणि टाईल्स ला तडे गेले आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते.
जबर आर्थिक नुकसान , आर्थिक मदत मिळावी – या घटनेमुळे मुरली भाकरे यांचे जबरदस्त आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदत मिळावी असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close