मा.अरविंदजी केजरीवाल यांच्या अटकेचा वर्धा जिल्हा आप व इंडिया अलायन्स तर्फे नोंदविला जाहीर निषेध
वर्धा / आशीष इझनकर
दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना काल रात्री लोकतांत्रिक मूल्यांना पायदळी तुडवून तथा तथ्यहिन आरोपातून अटक करण्यात आली असून ही अटक पूर्णतः राजकीय हेतूने प्रेरित असून आम आदमी पार्टीचा राजकीय विस्तार थांबवण्याच्या हेतूने केंद्रातील भाजपा सरकार सुरुवातीपासूनच आम आदमी पार्टी विरोधात बदल्याचे राजकारण करीत आहे. तीन वेळा दिल्लीमध्ये माननीय अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टीचा पराभव करून सरकार स्थापन केले, ही पराभवाची खंत भारतीय जनता पार्टी पचवु शकली नाही व आज भाजपा केंद्रामध्ये आहे तेव्हा सत्तेचा दुरूपयोग करून आम आदमी पक्षाच्या पुढार्यांना कारण नसताना अटक करून घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे, यामध्ये सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया व आता दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांना तथ्यहीन आरोपातून अटक करून तुरुंगात डांबण्यात आले, याबद्दल देशभर सामान्य माणसात असंतोष पसरला असून सामान्य माणूस रोष व्यक्त करतो आहे, केंद्रामध्ये बसलेले भाजपा सरकार विघटनात्मक हातांनी संविधानिक मूल्याची हत्या करते आहे, मुख्यमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीला राजकीय बदल्याच्या भूमिकेतून अटक करून जणू भारतीय जनता पार्टी लोकशाही व्यवस्थेवर सरळ हल्ला करीत आहे. तेव्हा आम आदमी पार्टी वर्धा आणि इंडिया अलायन्स यांचे वर्धा येथील असंख्य कार्यकर्ते या अटकेचा तीव्र निषेध करीत असून आमचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री
श्री. अरविंद केजरीवाल यांना मुक्त करण्यात यावे, यासंदर्भात निवासी मा. जिल्हाधिकारी वर्धा यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले, निवेदन सादर करताना आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दोड, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्री.मनोजभाऊ चांदूरकर, किसन अधिकार अभियान मुख्य प्रेरक श्री.अविनाश काकडे, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख श्री. श्रीकांत मिरापुरकर, प्रमोद भोमले, श्री. बाळा माऊसकर, ॲड. दुर्गाप्रसाद मेहरे, संजय आचार्य, कुणाल लोणारे, मंगेश शेंडे, आकाश सुखदेवे, नितीन झाडे, प्रवीण कलाल, असलम पठाण, ईसाराइल शेख, निषाद अली, संदीप डंभारे,वासुदेव राठोड,पंकज, सत्यकार, शारुक पठाण, धनंजय अग्रवाल, पप्पू पटेल, अजय डोंगरे, नंदकुमार कांबळे, प्रणित ठाकरे, निलेश देशमुख, अनुराधा देशमुख, ताराचंद लोखंडे, पंकज म्हसकर, दत्तु भोम्बे,गौतम वासे, संजय भगत, देशकर, संदिप भगत सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.