गीलाणी महाविद्यालय येथे डॉ.पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सवपर तज्ञाचे मार्गदर्शन

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी: दी. २८.१०२३ रोजी भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षाच्या निमित्याने एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोज तज्ञ राष्ट्रीय सेवा योजना शि.प्र. मं.विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय घाटंजी वतीने करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन इतिहास विभाग प्रमुख, प्रा.डॉ. वाय. एस.माहुरे सर होते.सरांनी आपल्या मार्गदर्शनपर विचारातून शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जिवनातील काही प्रसंग सांगितले व विदर्भातील अमरावती नगरीत श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून गोरगरीब, मागास व बहुजनांना शिक्षणाची मोठी संधी प्राप्त करून दिली आज या शिक्षण संस्थेतून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहे, विदर्भातील अकोला येथे असलेल्या कृषीविद्यापीठाला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असे नाव दिले, असे हे शेतकरीपुत्र भारताच्या इतिहासात पहिले कृषीमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली होती .त्यांच्या कार्याचे आपण नेहमीचं गुणगान केले पाहिजे असे मत मांडले सरांची व्यग्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.टी. एम.कोटक यांनी सुद्धा आपले विचार अध्यक्षीय भाषणातुन मांडले. मंचावर उपस्थित रा. से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सी.आर.कासार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सह-कार्यक्रमाधिकारी प्रा.सुहास मोरे यांनी केले,या एकदिवसीय व्याख्यानमालेत प्रा.डॉ.विजय जगताप, प्रा.डॉ. प्रदीप राऊत,प्रा.डॉ. कविता किर्दक, प्रा.डॉ. नागलक्ष्मी तिरमनवार, प्रा. जयश्री मोरे, प्रा.डॉ. मिलिंद ढाले ,प्रा. प्रणित ठाकरे, प्रा. प्रदीप राठोड, प्रा.चेतन शहाकार, प्रा. डॉ. सलिम शेख, प्रा. राजेंद्र घोडिले, प्रा.अमित ओळंबे व इतर कर्मचारी उपस्थित होते.