बलशाली आणि प्रगत भारत हे डॉ कलामाचे स्वप्न: – राहुल डोंगरे
शारदा विद्यालय येथे प्रतिपादन
भंडारा ( प्रतिनिधी)
भारताचे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ,शिक्षक,लेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून तमाम भारतीयांसमोर आदर्श निर्माण करणारे मिसाईल Man डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम हे आपले प्रेरणास्थान आहेत.आपल्या उत्तुंग कार्याद्वारे त्यांनी भारताला सामर्थ्य देण्यासोबतच जगाच्या इतिहासात वेगळी उंची मिळवून दिली.अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण बनविले.बलशाली आणि प्रगत भारत हे त्यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी विचाराला कृतीची साथ देणे हे युवकांची नैतिक जबाबदारी आहे.मोबाईलचा अतिरेक वापर टाळून विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा असे असे प्रतिपादन राहुल डोंगरे यांनी केले.ते डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम जयंती च्या निमित्ताने आयोजित “वाचन प्रेरणा दिन”कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ विद्यालय तुमसर येथे बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्योती बालपांडे हया होत्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गीत,नृत्य, भाषण याद्वारे डॉ. ए .पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.स्वतःच्या स्वार्थाचा तसूभरही विचार न करता अहोरात्र देशासाठी अविरत कार्य करणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे देशाचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत असे प्रमुख अतिथी ज्योती बालपांडे यांनी मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक गडपायले,श्रीराम शेंडे,वासू चरडे,संजय बावनकर,प्रा.नवीन मलेवार,अशोक खंगार, रूपराम हरडे, अंकलेष तिजारे,प्रशांत जीवतोडे,प्रीती भोयर, नीतुवर्षा घटारे,विद्या मस्के,सीमा मेश्राम,प्रा.रूपा रामटेके,प्रा.माधवी खोब्रागडे,नलिनी देशमुख,सुकांक्षा भुरे, झंकेश्वरी सोनवणे,दिपक बालपांडे,नारायण मोहनकर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन कू.गुंजन बालपांडे हिने केले तर आभार नीतुवर्षा घटारे यांनी मानले.