दोन सापांच्या मधात सापडला मुंगूस अन…
सोशल मीडियावर साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात शक्यतो मुंगूस सापावर भारी पडतो. पण काही वेळा हा गेम उलटू सुद्धा शकतो. याची प्रचिती या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. .
सोशल मीडियावर प्राण्यांमधील थरारक लढतीचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. मात्र सध्याचा हा व्हिडिओ इतका अनोखा आणि मजेदार आहे की क्वचितच कुणी असे दृश्य कधी पाहिले असावे. साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईबद्दल आपण सर्वजण अनेकदा ऐकतो. दोघांमधील भांडण पाहून अनेकवेळा लोकांना हसू येते. मात्र सध्याच्या व्हिडिओमध्ये एक अनोखे दृश्य दिसून आले. यात साप आणि मुंगूस तर आहेतच सोबतच सापाच्या जोडीला त्याची नागीणही दिसून आली. हे दृश्य कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटत नाही. आता यांच्या या लढतीत नक्की कोण कुणावर बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. चला जाणून घेऊयात.
कोण कुणावर पडलं भारी?
साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईत अनेकदा मुंगूस वरचढ ठरतो. मोठमोठे विषारी सापही मुंगूस पाहून पळून जातात. मात्र, कधी कधी मुंगूसही सापापुढे हार मानताना दिसून येतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच दृश्य पाहायला मिळणार आहे. व्हिडीओमध्ये एक नाग आणि नागीण कसा आपला फणा पसरवून शेतात उभे आहेत हे तुम्ही पाहू शकता. अचानक एक मुंगूसही तिथे पोहोचतो. मुंगूस सापाची शिकार करायला तिथे येतो, पण बिचारा स्वतः त्यांच्यात अडकतो. व्हिडिओत आपल्याला मुंगूसाची हतबलता दिसून येते. दोन सापांच्या मध्ये तो निपचित पडलेला असतो यावेळी साप त्यावर विषारी हल्ला करतानाही दिसून येतो ज्याच्या उत्तरार्ध मूंगूसही त्याला चावण्याच्या प्रयत्न करतो मात्र त्याची प्रकृती इतकी खराब असते की त्याला सापांच्या या विळख्यातून उठताच येत नाही आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
हा व्हायरल व्हिडिओ @india.yatra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “घोर कलियुग लोकांकडे कुणाला मदत करायला वेळ नाही, पण व्हिडीओ बनवायला वेळ आहे, हे महादेव, आता कलियुग लवकर संपवा, हर हर महादेव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुंगुसाला का बांधले आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.