क्राइम

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी डॉक्टर तरुणाला अटक

Spread the love

हैदराबाद  /विशेष प्रतिनिधी

       आरोपी डॉक्टर अमर सहस्य

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर तरुणीने इंजेक्शन द्वारे औषधांच्या ओव्हरडोस घेत आयुष्य संपवले होते. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली होती. पोलिसांनी या प्रकरणात सखोल आणिं तांत्रिक चौकशी केल्यावर ही आत्महत्या प्रेम संबंधात मिळालेल्या अपयशातून झाली असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी सबंधित डॉक्टर तरुणाला अटक केली आहे. बटुला दीपिका रा.विजयवाडा आंध्रप्रदेश असे तरुणीचे तर डॉक्टर अमर सहस्य असे आरोपीत डॉक्टर तरुणाचे नाव आहे. तो बचुपल्ली येथील रहिवासी आहे. आणि तो एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा येथील सरकारी रुग्णालयात काम करत होता. फोन रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांना आला. त्यानंतर महिन्याभराने ही कारवाई करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

विजयवाडा येथील सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी असलेली बटुला दीपिका ही अ‍ॅनेस्थेसियोलॉजीचा अभ्यास करत होती. विजयवाडा येथील सरकारी जनरल हॉस्पिटलमध्ये ती ड्युटी डॉक्टर म्हणून काम करत होती. ५ फेब्रुवारी रोजी तिने रुग्णालयाच्या खोलीतच स्वतःला संपवलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिने स्वतःला एक प्राणघातक डोस इंजेक्शनने दिला होता.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ती आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळली. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सहकारी विद्यार्थी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर दीपिकाच्या पालकांनी तक्रार दाखल करत तिच्या मृत्यूच्या कारणांची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली.व्हॉट्सअॅप मेसेजवरुन निष्कर्ष

तपासादरम्यान माचवरम पोलिसांनी दीपिकाच्या मोबाईलचा फोन डेटा आणि व्हॉट्सअॅप मेसेजचा अभ्यास केला. तिने मृत्यूच्या काही काळापूर्वी अलुगुपल्ली अमर सहस्य नावाच्या डॉक्टरशी बोलल्याचे समोर आले. पोलिसांनी सांगितले की ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास झालेला हा कॉल सुमारे नऊ मिनिटे चालला. या दोघांनी यापूर्वी अनेक वेळा संवाद साधला होता. शेवटच्या कॉलवर झालेलं बोलणं आणि दोघांमधील नातेसंबंधांतून दीपिकाने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे.

प्रेमसंबंधातून तणाव

पोलिसांनी सांगितले की, दीपिका आणि अमर यांच्यात प्रेमसंबंध सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र अमर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याची तयारी करत होता. अमरने दीपिकाशी लग्न करण्यास नकार दिला होता. यामुळे तिला प्रचंड भावनिक त्रास झाला असावा, असा अंदाज आहे. या परिस्थितीमुळे तिला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले असावे, असेआतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांवरुन पोलिसांना वाटते.

आरोपी डॉक्टर अमर सहस्य हा बाचुपल्ली येथील आहे. तो एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा येथील सरकारी रुग्णालयात काम करत होता. एनटीआर पोलिस आयुक्तालयाने सोमवारी त्याला अटक केली. अमरवर जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close