सामाजिक
जागतिक महिला दिनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका व कर्मचारी महिलांचा सत्कार

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई
नेर येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिलांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील डॉ. माला गायनर, डॉ. कल्पना सुरजूसे, डॉ. रूपाली नरोटे, स्नेहल निंबाडे, शितल वैद्य, अश्विनी उईके, मनीषा कापडे, सुप्रिया मालटे यांना पुष्प गुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली मासाळ,(महिला जिल्हा प्रमुख)अर्चना इसारळकर(शहर प्रमुख) अॅड. रश्मी पेटकर(शहर प्रमुख) वनिता मिसळे(माजी नगराध्यक्षा न.प.नेर) पल्लवी देशमुख(शहर संयोजीका) लता काळे, सारिका महल्ले, सुषमा कदम, माधुरी आठवले व अन्य कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1




