तिने माशात असे काय पाहिले की ती इतकी घाबरली की तिने जेवणंही केलं नाही
मांसाहारी जेवण अनेक लोकांना पसंद आहे. चिकन, मटण ,मासे अश्या वेगवेगळ्या लोकांच्या पसंती आहेत. बाजारातून एक महिला असेच मासे घेऊन आली . पण तिने जेव्हा मासे शिजवण्यासाठी ठेवले तेव्हा ती घाबरली. कारण तिने जेव्हा असे शिजवायला घेतले तेव्हा एका माशाला मानवा प्रमाणे दंत होते. त्यामुळे ती इतकी घाबरली की तिने रात्रीचे जेवणंही केलं नाही.
ब्राझीलमधीलही महिला. पॉला असं तिचं नाव. ब्राझीलमधीलच एका समुद्रकिनाऱ्यावर ती फिरायला गेली होती. तिथं तिला मासे दिसले. रात्रीच्या जेवणात मासे बनवूया असं तिनं ठरवलं. म्हणून तिनं मासे खरेदी केले. घरी आल्यावर तिनं मासे शिजवण्याची तयारी सुरू केली. तिनं मासे स्वच्छ करायला घेतले. यावेळी जसं तिनं माशाचं तोंड उघडलं, तसा तिला धक्काच बसला. तिनं याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माशात असं काय दिसलं?
आता माशाच्या तोंडात असं काय होतं? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. या माशाचा जबडा चक्क माणसासारखा होता. त्याच्या तोंडात माणसासारखे दात होते. तरी पॉलाच्या कुटुंबाने तो मासा फ्राय केला आणि खाल्लासुद्धा. मासा खाल्ल्यानंतर घरच्यांनी तो सामान्य माशाइतकाच चविष्ट असल्याचं सांगितलं. पण पॉलामध्ये ते खाण्याची हिंमत नव्हती. मासा सोडा पॉलाला मात्र जेवणही गेलं नाही. तिनं काहीच खाल्लं नाही.
पॉला म्हणाली, हे पाहिल्यानंतर मला इतकं विचित्र आणि भीतीदायक वाटलं की मी रात्रीचे जेवणदेखील केलं नाही.
याआधीही सापडला होता असा मासा
याआधी फिलिपाइन्समधील महिलेलाही असा मासा सापडला होता. मारिया क्रिस्टीना कुसी नावाची ही महिला, तिनं बाजारातून अनेक प्रकारचे मासे विकत घेतले होते. त्यापैकी एका माशाला माणसासारखे दात होते. ती घाबरली. सुरुवातीलाहे दात माणसाचे असतील, असं तिला वाटलं. पण जेव्हा तिने तपासले तेव्हा ते दात माशाच्या तोंडाला चिकटलेले होते, म्हणजेच ते त्याचे दात होते. मारियानेनंतर तो मासा फेकून दिला.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, त्या माशाची किंमत 4 डॉलर म्हणजे सुमारे 320 रुपये होती. त्या माशाचं नाव बिगहेड कार्प, ज्याला इमेल्डा असंही म्हणतात. पूर्व आशियातील लोकांना हा गोड्या पाण्यातील मासा खायला आवडतो.