शिवप्रेमींनी फडणवीसां वर केला हल्लाबोल ; शरद पवार गटाने फटकारले
शिवप्रेमींनी फडणवीसां वर केला हल्लाबोल ; शरद पवार गटाने फटकारले
मुंबई / नवप्रहार डेस्क
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यानंतर राज्यात यावर राजकारण सुरू झाले आहे. यावर सत्तापक्ष आणि विपक्षा कडून दावे प्रतिदावे करण्यात येत असून दररोज नवनवीन वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटत आहे.
शिवाजी महाराज यांनी सुरत लुटलीच नव्हती असा दावा करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता सादर केली. मात्र त्या कवितेतील संदर्भ वादग्रस्त असल्याने शिवप्रेमींनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
त्याचवेळी फडणवीसांचा तो व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट करत त्यांना फटकराले. या कवितेतील संदर्भाला उत्तर म्हणून ठाकरे शैलीतलं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला.
टीव्ही 9 च्या कार्यक्रमात फडणवीसांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीत एक दावा केला. ”कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा महाराजांसमोर आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की अशीच माझी आई असती तर मी देखील तेवढा सुंदर असतो”, असे फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या त्या व्हिडीओसोबत राष्ट्रवादीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत अशा प्रकारची कविता लिहणाऱ्या कविला शिवसेनाप्रमुख फटकारताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीने या व्हिडीओवरून एक पोस्ट शेअर करत भाजप व फडणवीसांना फटकारले आहे. ”ज्या शिवछत्रपतींना आपल्या आईंबद्दल नितांत आदर होता ते आपले महाराज राजमाता जिजाऊसाहेबांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी का करतील? अहो फडणवीसजी, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त खोटा इतिहास पेरणाऱ्या परंपरेचे वारसा चालवता पण आम्ही मराठी जनतेसमोर तुम्हा लोकांचा कपटी शिवद्रोही चेहरा समोर आणू” असा इशारा राष्ट्रवादीने या पोस्टमधून दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वांना असेच शिकवले की, शिवरायांनी सुरत लुटली होती, पण तसे काहीच झाले नव्हते. शिवरायांनी सुरत लुटलीच नव्हती. त्यांनी केवळ स्वराज्याचा खजिना तेथील काही लोकांकडून परत आणला, असे धक्कादायक विधान केले होते.