स्वर्गवासी अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय मोर्शी येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा
मोर्शी / संजय गारपवार
स्थानिक स्व. अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय मोर्शी येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी वन जीव सप्ताह उत्साहात पार पडला. वन्यजीव, वनसंपदा वाचवायचे असल्यास स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला पाहिजे असे प्रतिपादन करून आयएफएस अधिकारी श्री सुहास चव्हाण साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर २०२३ रोजी वन्यजीव सप्ताह च्या शेवटच्या दिवशी स्थानिक स्व अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय मोर्शी मध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मीनाक्षी गणगणे मॅडम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयएफएस अधिकारी श्री सुहास चव्हाण साहेब वनपाल श्री गांजरे साहेब, वनरक्षक कु. पुजा गणवीर मॅडम उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले व त्यानंतर आपल्या भाषणांमधून श्री सुहास चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना वनसंपदा, जैवविविधता, तसेच सरकारने राबवलेल्या विविध कार्यक्रमाचे विवेचन विद्यार्थ्यांसमोर केलं त्यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही या देशाचे भविष्य असून ही वनसंपदा राखण्याची जबाबदारी तुमची आहे अशा पद्धतीचे मार्गदर्शन करून उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच वनपाल श्रीमान गांजरे साहेब यांनी आपल्या खास शैली मधून विद्यार्थ्यांना कविता, गीत व मार्मिक भाषेतून वन्य जीव सप्ताहाचे महत्त्व इत्यादी आपल्या मनोरंजक शैलीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वनरक्षक कू. पूजा गणवीर मॅडम यांनी सुद्धा आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वनसंपदा बद्दल माहिती सांगितली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गणगणे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना वन म्हणजे आपले जीवन जैविविधता हेच आपल्या भविष्यामध्ये आपली पृथ्वी सुरक्षित राखण्यासाठी कार्य करत आहे याबद्दल विद्यार्थ्यांना भरपूर माहिती दिली. स्थानिक शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे संचलन श्री संदीप टिक्कस व आभार प्रदर्शन श्री पवार सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.