क्राइम

महिलेने प्रेमास दिला नकार तर तरुणाने केला असा प्रकार

Spread the love
तीन मुलांची आई असलेल्या महिले समोर त्याने ठेवला होता प्रस्ताव 
 

पिंपरी-चिंचवड / नवप्रहार वृत्तसेवा 

                    प्रतिमा नामक महिला रावेत परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घरकाम करीत होती.तिचा नवरा देखील काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होता. ती ज्या थिजनी काम करायची त्या ठिकाणी जुल्फिकार नामक तरुण देखील प्लांबिंग चे काम करायचा.महिलेने प्रेम स्वीकारण्यास नकार दिल्याने प्लंबर असलेल्या तरुणाने तिचा खून केलाय.
 प्रतिमा प्रमोद यादव अस खून झालेल्या ३२ वर्षीय महिलेच नाव आहे. प्रतिमाने त्याच्या सोबत प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याने गळा दाबून, भींतीवर डोके आपटून तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपी प्लंबर तरुण आरिफ झुल्फिकार मलिक याला रावेत पोलीसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रतिमा प्रमोद यादव असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. महिलेचा पती प्रमोद यादव यांनी रावेत पोलीस ठाण्यात य़ा प्रकरणी तक्रार दाखल केलीय. तर आरिफ झुल्फइकार मल्लिक (वय २१ वर्षे) याला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितले की, प्रमोद यादव यांचे कुटुंब रावेतमधील फेलिसिटी सोसायटीत राहते. त्यांना तीन मुलेही आहेत. प्रमोद आणि त्यांची पत्नी प्रतिमा सोसायटीत हाउसकीपिंगचे काम करत होते. तर आरोपी प्लंबिंगची कामे करायचा
सोसायटीमध्ये प्रतिमा या काम करत असताना आरिफने त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला. तसंच प्रेमसंबंधाबाबत विचारणा केली. यावर प्रतिमा यांनी नकार देत पती आणि पोलिसांना याबाबत सांगणार असल्याचं म्हटलं. यानंतर रागाच्या भरात आरिफने प्रतिमा यांचा गळा आवळळा. त्यानंतर मारहाण केली. प्रतिमा यांना भिंतीवर ढकलून दिलं. यात प्रतिमा यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close