हत्तीने रशियन महिलेला सोंडेने पकडून आपटले, अस्थिभंग
मुंबई / नवप्रहार मीडिया
जंगली प्राण्यांना आपल्या फायद्यासाठी लोकांनी जंगलाच्या बाहेर आणून त्यांना प्रशिक्षित करून त्यांचा स्वतःच्या उपजीवेकेसाठी उपयोग करून घेतला आहे . पण जंगली प्राणी हे जंगलीच असतात एखाद्यावेळेस ते बिथरले तर त्यांना सांभाळणे कठीण होऊन बसते. असाच प्रकार राजस्थान मधील आमेर किल्ल्यावर पाहायला मिळाला.येथे पर्यटकांना किल्ल्याची सैर करावणाऱ्या हत्तीने एका रशियन महिलेला सोंडेने पकडून जमिनीवर आपटले आहे. त्यामुळे तिच्या पायाचे हाड मोडले आहे. तिला अन्य कुठली गंभीर इजा झाली नाही याबाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.आणि यापुढे अश्या जंगली प्राण्यांना याठिकाणी प्रवेश देऊ नये आहि मागणी केली आहे.
वन्य प्राणी अन्नाच्या लोभापोटी सहज माणसाने करायला लावलेल्या गोष्टींचं पालन करतात, पण शेवटी ते प्राणीच असतात. ते कधी माणसांवर हल्ला करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या विशेषतः हत्तींच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडतात. नुकतीच अशीच एक घटना राजस्थानमधील आमेर किल्ल्यावरून समोर आली आहे. येथे एका हत्तीने एका रशियन पर्यटकाला आपल्या सोंडेनं जमिनीवर आपटलं.
आमेर किल्ल्यावर हत्तीच्या हल्ल्याची ही घटना 13 फेब्रुवारीला घडल्याचं बोललं जात आहे. परंतु त्याचे सीसीटीव्ही फुटेज आताच समोर आले आहेत. हत्तीने आधी रशियन पर्यटकाला आपल्या सोंडेत गुंडाळलं. त्यानंतर तिला जमिनीवर फेकलं. सुदैवाने पर्यटक हत्तीच्या पायांच्या खाली आली नाही . या अपघातात महिलेचा पाय मोडला. मात्र तिचा जीव वाचला. या घटनेनंतर प्रशासनाने हत्ती गौरीला किल्ल्यावर बंदी घातली आहे.
हा झाल्यानंतर पेटानेही याप्रकरणी सतर्कता दाखवली आहे. पेटाने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गौरीला अभयारण्यात पाठवण्याची सूचना केली आहे. त्यांनी लिहिलं की हत्ती त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच आरामात राहू शकतात. जर ते अशा प्रकारे सवारीसाठी वापरले गेले तर ते आक्रमक होतीलच. हत्तीच्या माहुतने सांगितलं की, गौरी हत्तीणीच्या पाठीवर आधी बसलेल्या एका पर्यटकाचा खाली उतरताना तिच्या डोळ्याला हात लागला होता. त्यामुळे ती संतापली होती. मात्र, याआधीही गौरीने किल्ल्यातील एका दुकानदारावर हल्ला केला होता. त्यावेळी हे प्रकरण समोर येऊ शकलं नाही. यावेळी एका परदेशी पर्यटकामुळे हा झाला.