विशेष

संतापजनक …. कापड व्यावसायिकाने लावला घरावर पाकिस्तानी झेंडा

Spread the love
देशद्रोहाचा गुन्हा दाखल 
मुरादाबाद (युपी )  / नवप्रहार मीडिया 
                      उत्तरप्रदेश  म्हणून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील मुरादाबाद जीह्यातील भगतपुर ठाण्याच्या हद्दीतील बुढानपूर अलिगंज येथील रहिवासी कापड व्यवसायिकाने आपल्या घरावर पाकिस्तानी झेंडा लावला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच पोलिसांनी दखल घेत पिता पुत्रावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
                बुढानपूर अलिगंज (जी. मुरादाबाद ) येथील रहिवासी रईस नावाच्या व्यक्तीच्या घरावर पाकिस्तानी झेंडा लावण्यात आला होता. ही बाब परिसरातील जनतेला कळल्यावर त्यांनी याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत झेंड्याची व्हिडीओ शूटिंग घेतले आणि फोटो काढले. त्यानंतर घरावरील झेंडा काढण्यात आला.
पिता- पुत्राला अटक – पोलिसांनी कपडा व्यावसायिक रईस आणि त्याचा मुलाला अटक केली आहे. त्यांच्यावर देशद्रोह अंतर्गत भादवी कलम 153 ए  आणि 153 बी नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी झेंडा लावण्यामागील उद्देश अध्याप स्पष्ट नाही केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close