लुंबिनी बुद्ध विहार मध्ये धम्मदान पेटी भेट
माजी नगरसेवक बंडू आठवले यांच धम्मदान
चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
चांदुर रेल्वे शहरातील लुंबिनी बुद्ध विहार मध्ये कार्तिक पौर्णिमा व वर्षावास समापन सोहळ्याच्या
निमित्ताने आज माजी नगरसेवक तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हाप्रमुख बंडू आठवले व त्यांच्या पत्नी अरुणा आठवले यांनी धम्मदान पेटी आज दान केली.
आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या तीन महिन्याच्या वर्षावास कालावधीमध्ये मिलिंद नगर मधील लुंबिनी बौद्ध विहारांमध्ये ग्रंथ पठण करण्यात आले होते. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचे पठण माताजी आर्या पारामिता यांनी केले. वर्षावास परित्राण पाठाच्या समाप्ती सोहळ्यासाठी आज गुलबर्ग कर्नाटक मधील माताजी सुमना, अमरावती मधील माताजी धम्मचारीणी, माताजी पारमिता रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष तुळसाबाई खवसे,मंगला वानखडे
यांच्या हस्ते महामानवाच्या फोटोचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हाप्रमुख बंडू आठवले अरुणा बंडू आठवले यांच्या तर्फे लुंबिनी बौद्ध विहार मिलिंद नगर बुद्ध विहारासाठी स्टीलची धम्मदान पेटी दान करण्यात आली.
भिक्खूनि संघाच्या उपस्थितीत परित्राण पाठ घेण्यात आला उधान परामीता करण्यात आली.
मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या महिला रेखा वानखडे, कविता नितनवरे, संगीता गवई, इंदिरा गवई, बेबी वानखडे, दीपा गवई,आशा गवई,अनिता आठवले, सिंधु दुरेधन, अरुणा आठवले, जोशना वरठे, पुष्पा वानखडे,वनमाला काळे, वंदना मकेश्वर, सुनीता लोणारे, निकिता मेश्राम, उषा मेश्राम, ललिता डोंगरे, मेंना सूर्यजाशी, लता गवई, सुनंदा गवई, बेबी वानखडे,मीना आठवले, कु रुपाली वानखडे, कल्पना वानखडे, स्नेहल वानखडे, कमलाबाई सरदार,इंदिरा वानखडे,छाया वाहने, ममता वानखडे, आशा वानखडे,सविता फुलझले,सुजाता मकेश्वर,मनकरना डेरे, महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.