सामाजिक

ढीवरवाडा ते मांडवी जंगलव्याप्त रस्तावर चोरांची टोळी सक्रिय

Spread the love

:प्रवासासह परिसरातील नागरिकांत चिंतेत भर.

करडी – सध्या उन्हाळा सुरु असल्याने लग्न सराई जोरात सुरु आहे. ठीकठिकाणी मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून येते.लग्न सराई असल्याने कुणी नगद रोख तर महिला दागदागिने अंगावर घालून जातात. भंडारा ते करडीला जात असलेल्या रस्त्यावर ढीवरवाडा ते मांडवी जंगलव्याप्त भाग पडतो. भंडारा शहर ह्या जिल्हाच्या ठिकाण असून परिसरातील शासकीय कार्यालये तसेच जिल्हा रुग्णालय सुद्धा भंडाऱ्यालाच असल्याने रात्री अकरा पर्यंत मार्ग सुरु असते. ह्याच संधीचा फायदा घेत जगलंव्याप्त भागात चोराच्या टोळीने तळ ठोकून सायंकाळी 7 च्या नंतर येना जाणाऱ्याला प्रवासाला अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व दागदागीने लुटलाचे प्रकार समोर येत आहे. जंगलात चोरांची टोळी येणाऱ्या वाहनाना रस्त्यावर दगड आडवे करून तर कधी आडवा लाकूड करून वाहनाना अडवून त्याची लूट करतात अशी भीती परिसरातील नागरिकांमंध्ये निर्माण झाली आहे. सदर जागा करडी पोलीस स्टेशन व कारदा पोलीस स्टेशन च्या संयुक्त हद्दीत येत असल्याने दोन्ही स्टेशन मंधून रात्री गस्त सुरु झाली आहे पण अध्यापही कोणत्याच प्रकारची चोरांची टोळी पोलिसाना आढल्याचे दिसून आले नाही.गावाकरी चिंतेत असून रात्री 8:30 च्या सुमऱ्यास चोरांची टोळी प्रवासाला आडवी झाल्याचे समजताच गावातील 40-50 तरुण मंडळी प्रवासाच्या मदतीला धावून आले व त्यांनी करडी पोलीस स्टेसन ला बातमी कडवून चोरांचा पाठलाग केला पण चोरांची टोळी जंगलात फरार झाल्याचे समजते. 8 दिवसा अगोदर एका ट्रॅक चालकाला, दोनचाकी वाहणाला अडवून त्यांचा जवळील दागदागिने व रोख रक्कम लुटल्याचे सांगण्यात येते.असाच प्रकार काल रात्री 10 वाजता जंगलव्याप्त भागात घडला गिरधारी तितीरमरे हा युवक भंडारा कडून गावाला जात असताना जंगलात दहा ते बारा चोरांची टोळी तोंडाला मुस्का बांधून ह्या युवकला आळवे झाले व गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण युवकांनी समयसूचकता दाखवून टूव्हीलर मांडवीच्या दिशेने पलटवली असता चोरांनी दगडाचा मारा केला, परंतु युवक थोडक्यात बचावले व मांडवी येथे जाऊन नागरिकांस सांगितले असता शंभर ते दिढसे नागरिकांणी चोराचा पाठलाग केला परंतु चोर भेटले नाही. चोर जरी आडवे होत असले तरी तेथील घटनेची कारधा किंवा करडी पोलीसात तक्रार नाही. परंतु तरीही त्या घटनेची दहशत नागरिकांत अध्यापही कायम असल्याचे सांगितले जात आहे.चोराचा प्रादुर्भाव वाढत जात असल्याने सायंकाळी 7 च्या नंतर रहदारी करण्याऱ्याना जीव मुठीत धरून रहादारी करावी लागते. जगलंव्याप्त भाग असल्यामुळे वनविभागाने या मार्गांवर कॅमेरे लावून रात्रीचा पहारा वाढवावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर परिसरातील स्थानिक लोकांकडून होत आहे.
“चोराच्या टोळीचे रोजच नवनंवीन घटण्या ऐकायला भेटतात त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले आहेत. वन विभाग व पोलीस विभागाने संयुक्त रित्या सर्च अभियान राबव्हावे आणी जंगलव्याप्त भागात ट्रॅप कॅमेरे लावावे “धामदेव वणवे मा. सरपंच ढीवरवाडा

“काल मी स्वतः आणी कारधा पोलीस मिळून पेट्रोलिंग केली आहे पण कोणत्याही अनुचित प्रकार आढळन आला नाही पण आमची पेट्रोलिंग नेहमीच सुरु राहील” गायकवाड सर ठाणेदार करडी पोलीस स्टेशन

15 दिवसापासून चोऱ्यांचा टोळीच्या धुमाकूळ सुरु आहे. वाहनाला जंगलात अडवल्यावर ते आम्हाला गावात येऊन सांगतात मग आम्ही 50 – 60 गावकरी स्थळावर पोहचतो. पण तो पर्यंत चोरांची टोळी जगल्यात फरार झालेली असते.असा प्रकार 15 दिवसा पासून निरंतर चालू आहे ” जितेंद्र मेश्राम गावकरी मांडवी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close