विधिमंडळाचे कामकाज सुचारु पद्धतीने पार पडावे यासाठी प्रयत्नशील होते- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विधानपरिषद कामकाज फारसे तहकूब न होता अधिवेशनाच्या निमित्ताने सुसंवाद, वेळेचे नियोजन, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रश्नांचे प्रतिबिंब विधिमंडळात पडावं या दृष्टीने कामकाज करण्याचा प्रयत्न केला – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे (विशेष प्रतिनिधी ) : विधान परिषदेच्या बद्दल तांत्रिक माहिती चुकीचे सांगून हेतुपुरस्सर आरोप केले अश्या व्यक्तींच्या विरुद्ध त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न झाल्यास हक्कभंग दाखल करून घेण्यात येईल अशा प्रकारे देखील निर्णय झाले. फारसे कामकाज तहकूब न होता अधिवेशनाच्या निमित्ताने सुसंवाद, वेळेचे नियोजन, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रश्नांचे प्रतिबिंब विधिमंडळात पडावं या दृष्टीने डॉ.गोऱ्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारचे यश मिळाले. या कामांमध्ये सर्वच पक्षाच्या विधान परिषदेचे नेते, प्रतोद सर्व सदस्यांचे चांगले सहकार्य मिळाले. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळाले असे प्रतिपादन डॉ.गोऱ्हे यांनी पुणे येथील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषद केले.
याप्रसंगी, शिवसेना पुणे शहर प्रमुख श्री. नाना भानगिरे,शिवसेना महिला शहर प्रमुख श्रीमती. पूजा रावेतकर, बारामती लोकसभा संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे,बारामती दौंड इंदापूर जिल्हाध्यक्ष सीमा कल्याणकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कामकाज चांगल्या प्रकारे झाले. यामध्ये,
* अवकाळी पाऊस,
* मराठा आरक्षण,
* दुष्काळाची परिस्थिती तसंच अमलीपदार्थांच्या मुळे झालेली महाराष्ट्राची हानी,
* प्रचंड गुन्हेगारांचा उच्छाद,
* तुळजाभवानीचे दागिने चोरीला जाणं त्याच्यावरती ताबडतोब आरोपींना अटक करण्याचे दिलेले निर्देश,
* दुष्काळ सदृश परिस्थितीवरती आणि आवर्षणाच्या परिस्थिती वरती झालेली शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर सामाजिक संस्थांच्या भरणाच्या बैठक,
* अल्पवयीन मुलींचे कलाकेंद्र वरती जो वापर होतो तो रोखण्यासाठी घेतलेली मराठवाडा स्तरीय बैठक,
* नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य विषयक प्रश्नांबद्दल घेतलेली उच्चस्तरीय बैठक,
* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रश्नांच्या संदर्भात घेतलेली बैठक अशा अनेक बैठक देखील विधान परिषदेची उपसभापती या नात्याने मी घेतल्या.
* तळवडे, पिंपरी चिंचवड, पुणे येथील दि.०८ डिसेंबर, २०२३ रोजी आग दुर्घटना स्थळी भेट दिलेला अहवाल मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री यांना उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी दि.११ डिसेंबर, २०२३ सादर केला.
या सगळ्या दहा दिवसांच्या काळामध्ये ४७ लक्षवेधी, तसेच १४ विधेयके, १३३ विशेष सूचना आणि ३ अल्पकालीन चर्चा याच्यावरती तपशीलवार चर्चा झाली. साधारणपणे ९४.५५% उपस्थिती आमदारांची होती आणि गोंधळापेक्षा संवाद आणि निर्णय स्वरूपाची सरकारकडून आलेले उत्तर त्याच्यामुळे आपला अधिकाधिक कामकाज व्हावं त्या दृष्टिकोनातून सगळेच विधान परिषदेचे सदस्य त्यांनी बराच वेळ या कामकाजासाठी दिला.
विदर्भात अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या परिस्थितीच्याबद्दलचा एक प्रस्ताव देखील सत्ताधारी पक्षाने लावला होता त्याच्यावर देखील चर्चा झाली. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, पर्यावरण विषयक प्रदूषणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक विविध अंगीच्या भूमिकातून चर्चा झाली. त्याच्यावरती चांगल्या प्रकारे उत्तरे देखील मिळाली.
लोक आयुक्त विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे जाऊन मंजूर झालं हे जसं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर कॅसिनो रद्द करण्याच्या बद्दलचा विधेयक मांडून ते पाठीमागे घेण्यात आलं हे देखील एक महत्त्वाचे घटना म्हणायला हरकत नाही. त्याच्या खेरीज उच्चतंत्र शिक्षण विद्यापीठा विषयक विधेयके, जमिनीचा गैरवापर होत असेल तर मग महसूल विभागाने हस्तक्षेप करून स्वतःहा मोहीम हाती घेणे अशा प्रकारचे विधेयक आणले व याच्याबद्दल चर्चा झाली.
विधानपरिषदेचा शतक महोत्सवी कार्यक्रम असल्यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत ज्यांनी- ज्यांनी वार्तांकन केले आहे, त्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि त्यांचे मनोगत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. हा कार्यक्रम देखील विशिष्ट प्रकारचा झाला.
याखेरीज लोकसभा निवडणुकीमध्ये किंबहुना लोकसभा आणि विधानसभा निवडणूकमध्ये महिलांना आरक्षण याच्यावरती राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मत मांडले.
वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी आणि चर्चा याच्यात तसेच विविध बैठकांमध्ये डॉ.गोऱ्हे सहभागी झाल्या. त्यातून राहिलेले जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नावरती काही तसा तोडगा निघालेला नाही. त्याच्याबद्दल सुद्धा बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.
विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिले जात नाही अशी ही टीका होते. त्याच्यावरती जर काही 10 दिवसातले वेळ मोजला कमीत-कमी सहा तास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी विविध विषयांच्या मध्ये भाषण केलेले आहे. हे जर पाहिलं तर सरासरी कामकाजाचा तुलने मध्ये जवळजवळ पाऊण दिवस एकटेच्या कामकाजावरती खर्च झाला हे देखिल याच्यामध्ये स्पष्ट होत आहे.
राज्याचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.