पहील्याच पावसात घाटंजी शहरातील नाल्यांची पोलखोल
नाल्यावरिल अतिक्रमण बाबत न. प. प्रशासनाने ठोस भुमिका घेण्याची गरज
घाटंजी तालुका प्रतिनिधी-
दी. २३/६/२४ रोजी रात्री आलेल्या पहील्याच पावसात घाटंजीतील शहरातील ब-याच भागातील नाल्याच् पाणी नालीवर अतिक्रमण करुन थाटलेल्या,दूकान, शेड, आणि इतर अतिक्रमणामूळे नाल्या बूजल्याने व पाणी वाहत नसल्याने नाल्या तुंबून दूर्गामाता वार्ड, पांढूर्णा रोड, वडार पुरा रस्ता व इतर ही भागातील नाल्याचे पाणी रस्त्यावर तसेच काहींचे घरात घूसल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पहील्या पावसातच न.प. प्रशासनाची नाली साफ-सफाई बाबत आणि नाल्यावरील अतिक्रमण बदल उपाययोजना नसल्याचे स्पष्ट दीसून आल्याचा सूर जनतेतून येत आहे. घाटंजी स्थानिक दूर्गामाता वार्ड ,पांढूर्णा रोड वरिल नाली अतिक्रमण समस्या कायमची नष्ट होईल का नाही? हा प्रश्न रहीवासी भागातील जनतेतून न. प. प्रशासन अधिकारी यांना विचारण्यात येत असून या नाली वर थाटण्यात आलेल्या अतिक्रमण धारकावर कार्यवाही करुन नगर परिषद ने नाल्यांचा स्वास मोकळा करुन जनतेच्या आरोग्यास हानिकारक ठरत असलेल्या परिस्थितीस आळा बसवण्याची मागणी होत आहे.
०००००००००००००००००