राजकिय

लोकसभेसाठी  वंचित बहुजन आघाडीकडून वर्धा मतदार संघात  संभाव्य उमेदवार जाहीर

Spread the love

 

संभाव्य उमेदवार जाहीर करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी हिरवी झेंडी दिल्याची जिल्हा कार्यकारीणीची पत्रकार परिषदेत माहिती

प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची घोषणा

वर्धा / आशिष इझनकर

वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीने वर्धा लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत घोषणा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहेय. जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊन प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्ह्णून घोषणा करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांचे नाव उमेदवारीबाबत पक्के करण्यात आले असून याची जाहीर घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा तिढा सुटला नाही, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा कार्यकरिणीला संभाव्य उमेदवार घोषित करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. वर्धा जिल्ह्यात लोकसभा उमेदवार घोषित केल्याने सध्या राजकीय खळबळ उडाली आहेय. वंचितचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, उपाध्यक्ष सुभाष खंडारे यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने आता खळबळ उडाली आहेय. आता यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेते ते पाहणे महत्वाचे आहेय.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close