मागणी

दुधाला हमीभाव दया , शिवबा संघटना व युवासेनेची मागणी.

Spread the love

.

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – महाराष्ट्रासह पारनेर, शिरुर तालुक्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन शेतकरी बांधव हा व्यवसाय करत आहे. मात्र सध्या शेतीमालाचे पैसे होत नाही आणि त्यामध्ये दुधाचे दर प्रचंड घसरले असल्याने दुधधंदा परवडत नाही. उत्पादन खर्च वाढतच चालला आहे . त्यावर कोणाचेही निर्बंध नाही. मात्र दुधा ला हमी नाही , हा शेतकरी बांधवावर अन्याय असल्याचे शिवबा संघटना पारनेर व शिरुर तालुकाप्रमुख बबन तनपुरे व सोमनाथ भाकरे यांनी सांगितले.
दुध दराबाबात शिवबा संघटना युवासेनेचे सहकार्यांची बैठक झाली, यामध्ये शिवबा संघटना अध्यक्ष तथा युवासेना तालुका प्रमुख अनिलराव शेटे,बबन तनपुरे ,सोमनाथ भाकरे,राजु लाळगे,शंकर वरखडे ,केशव शिंदे,यश रहाणे,योगेश भाकरे नवशाद पठाण,डॉ.ओंकार जाधव,रोहिदास लामखडे , ऋषीकेश शेटे,समाधान दुडे,ॲड. दत्तात्रय सोदक, दत्ता टोणगे, गणेश चौधरी,नागेश नरसाळे, निलेश दरेकर,माऊली पानगे, जयराम सरडे,अक्षय बेलोटे , अविनाश भाकरे, विकास मोरे, शांताराम पाडळे ,राहुल मोरे , अंकुश वरखडे,निलेश वरखडे , निलेश कदम,संतोष साबळे , गुलाब पानगे आणि इतर सहकारी हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये सबंधित मंत्र्याना निवेदन देण्याचे ठरले , त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दुग्धविकास मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील , खासदार निलेशजी लंके, खासदार अमोल कोल्हे यांना निवेदन इमेल या माध्यमातुन पाठविण्यात आले.
निवेदनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे. प्रचंड असंतोष शेतकरी बांधवांमध्ये असल्याचे सांगितले गेले. वेळीच दुधाचे दर वाढले नाही, तर शेतकरी,शिवबा संघटना ,युवासेना रस्त्यावर उतरुन पारनेर व शिरुर तालुक्यात आंदोलन हाती घेतील व आंदोलनाची ठिणगीचे रुपांतर महाराष्ट्रभर वणव्यात होईल ,असा इशारा शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे व शिरुर तालुका प्रमुख सोमनाथ भाकरे यांनी दिला आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close