राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र भर वृक्षारोपण
वर्धा ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर यांच्या पुढाकारात, आर्वी तालुक्यात ठीक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम साजरे
आर्वी : वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या मार्गदर्शनात, आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, रोजगार व स्वयं रोजगार वर्धा जिल्हाध्यक्षा सौं रेखा वानखडे, व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित आर्वी तालुक्यात ठीक ठिकाणी वृक्षारोपण,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौं रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र भर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे निर्देश महिला राष्ट्रवादी काँग्रेस ला प्राप्त झाले, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर यांच्या पुढाकारात, आर्वी तालुका अध्यक्षा सौं माधुरीताई सपकाळ, आर्वी शहराध्यक्षा, मीनाताई बरवट कर व महिला पदाधिकाऱ्यांनी सावळापूर मौजा, सरांगपुरी, नेरी मिर्झापूर, श्री साई परणकर अभियांत्रिकी महाविद्यालय आर्वी, व जनता नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात, वड, आंबा, पिंपळ, चिंच, गुल मोहर, पेल्टाफार्म, कडु लिंब, जांभूळ, अश्या वेगवेगळ्या 12 प्रकरच्या झाडांचे रोप लाऊन वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला यावेळी प्रामुख्याने, जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे,अर्चना धवणे सामाजिक न्याय विधानसभा अध्यक्षा, रोजगार व स्वयं रोजगार विधानसभा अध्यक्षा सोनाली जैन, माधुरी कवळे ,यास्मिन परवीन,सुप्रिया भोगे शुभांगी धानोरकर, सोनाली चिंधेकर,कमलेश चिंधेकर,अशोकराव धानोरकर,दिलीपराव बोरकर,अरुणराव उमरे, विक्की मेश्राम, प्रफुल सोमकुंवर,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते