सामाजिक

वाद – विवाद स्पर्धेचे आयोजन, बक्षीसाची लयलूट,स्पर्धकांनी आयोजकाशी संपर्क साधावा.

Spread the love

.
नेर:- प्रतिनिधि
नेर येथील निर्मल बन्सी लाॅन येथे 26 जानेवारी गणराज्य दिनाचे औचित्य साधून गेल्या 23 वर्षापासून लोकानुकंपाय बहूउध्देशय संस्था व पाॅवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरिय खुली वादविवाद स्पर्धा व मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही वाद विवाद स्पर्धेत सभागृहाच्या मते, “संविधानाला अभिप्रेत आरक्षणाचे निकष आर्थिक नसून सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आहे,” हा विषय ठेवण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना नरेंद्र डवरे 5001 रुपये प्रवीण मोरे 4001 रुपये, के. पी. देशमुख 2501 रुपये प्रा.अशोक राऊत 2111 रुपये, संदेश बांबोडे 2001 रुपये असे बक्षीस दिले जातील.तसेच प्रोत्साहन पर एक हजार रुपयाचे अनेक बक्षीस ठेवण्यात आलीत, विजेत्या स्पर्धकास एड.सलीम शाहा यांच्याकडून आकर्षक सिल्ड दिल्या जाईल, प्रा.प्रवीण बनसोडे यांच्याकडून महामानवाचे पुस्तक दिल्या जातील. या कार्यक्रमाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. अध्यक्ष म्हणून गजानन उईके, प्रमुख पाहुणे म्हणून नवप्रहारचे संपादक संजय पांडे, भाऊराव ढवळे, उत्तमराव ब्राह्मणवाडे, प्रदीप झाडे, भिकेश मालानी, राजेंद्र चिरडे, सुभाष भोयर, मनोज नाल्हे, एड. रमेश जूनगरे, डॉ. प्रवीण बनसोड,वकील दानिश, मुसा टिक्की, अभिनेत्री प्रतिभा पवार, वैशाली मासाळ, संगीता पवार, प्रमोदिनी मुंदाने कविता भोयर, अर्चना ईसाळकर इत्यादी मान्यवर मंचावर विराजमान राहतील. ज्या स्पर्धकांना वादविवाद स्पर्धेत नाव नोंदवायचा आहे, त्यांनी आयोजक नवनाथ दरोई 8999206806 व संक्षम दरोई 8080670992 या क्रमांकावर संर्पक साधावा

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close