‘ हात ‘ आणि ‘ आधार ‘ फाऊंडेशन चा पूरग्रस्तांना मदतीचा ‘ हात ‘
हात फाउंडेशन च्या वतीने सकाळी नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दत्तापूर चे ठाणेदार हेमंत ठाकरे व डॉ. महेश साबळे ( वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे ) यांच्या उपस्तितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून धामणगाव रेल्वे येथून जमा झालेली विविध सामग्री ( कपडे, भांडी, धान्य ) हात फाउंडेशन च्या माध्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील कापरा या गावात पाठवण्यात आली त्यावेळी हात फाउंडेशन च्या सदस्यांनी धान्य ,कपडे, भांडी घेऊन पूरग्रस्त भागात प्रस्तान केले त्यावेळी त्यांच्यासोबत आधार फाउंडेशन चे सदस्य व नानकी बाई वाध वाणी विद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी मिळून पूरग्रस्तांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली व सर्व पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू धान्य, कपडे ,भांडी, ब्लॅंकेट यासारखे वस्तू वाटून माणुसकीचा संदेश दिला पूरग्रस्तांनी हात फाउंडेशन धामणगाव रेल्वे आधार फाउंडेशन अमरावती व श्रीमती नानकी बाई वाधवाणी महाविद्यालयातील सर्वांचे आभार मानले.